MIE vs DC : आयपीएलमध्ये (IPL) 100 पेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या काही मोजक्याच खेळाडूंपैकी एक असलेल्या कायरन पोलार्ड (kieron pollard) याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची (MI) साथ सोडली. निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता तो मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. असं असलं तरी दक्षिण अफ्रिकेत सुरू असलेल्या लीगमध्ये (International League T20) मुंबई इंडियन्सच्या MI Emirates या टीमचं नेतृत्व करत आहे. दुबई कॅपिटल्सविरुद्ध (Dubai Capitals) खेळताना सर्वांच्या लाडक्या पोलार्ड तात्याने वेस्ट इंडिजची ताकद दाखवून दिली. (kieron pollard outstanding captains innings smashed 86 off 38 balls with 8 fours and 6 massive sixes in international league t20 Sports News)
लीगमधील एमआय एस्टिमेट्स (MI Emirates) आणि दुबई कॅपिटल्स विरुद्ध 13 वा सामना खेळवला गेला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दुबईने (Dubai Capitals) 222 धावांचा डोंगर उभा केला. सलामीला आलेल्या रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) आणि जो रूटने (Joe Root) चांगली सुरूवात करून दिली. उथप्पा बाद झाल्यानंतर मैदानात पॉवेलने पॉवर दाखवली आणि एमआयला भुईसपाट केलं. पॉवेलने फक्त 41 चेंडूत 97 धावांची खेळी केली. त्यावेळी पॉवेलने 10 सिक्सची आतषबाजी केली.
दुबईने दिलेल्या 223 धावांचा पाठलाग करताना पोलार्डच्या (Kieron Pollard) एमआयला पराभवाची धुळ चाखावी लागली. पोलार्डने एकाकी कॅप्तनी खेळी करत एमआयला (MIE) तारण्याचा प्रयत्न केला. एकीकडे एकामागून एक विकेट जात असताना पोलार्डने धुंवाधार खेळी सुरू ठेवली. पोलार्डने 38 चेंडूत 86 धावांची वादळी खेळी केली. त्यावेळी त्याने 8 फोर आणि 6 सिक्स खेचले. पोलार्डची पारी पाहण्याजोगी होती.
The Captain’s got the POWER! @kieronpollard55 led from the front for the @MIEmirates !
86 off 38 balls
8 FOURS AND 6 MASSIVE SIXES!
An OUTSTANDING captains innings today in Abu Dhabi!
Book your tickets now on https://t.co/VekRYhpzz6#DPWorldILT20 #ALeagueApart #MIEvDC pic.twitter.com/Tgp9kClOKz
— International League T20 (@ILT20Official) January 22, 2023
दरम्यान, नजीबुल्ला झद्रानचे (Najibullah Zadran) फटकेबाजी पाहून अनेकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. फक्त 9 बॉलमध्ये त्याने 30 धावा केल्या. त्यात त्याने 4 सिक्स आणि 1 फोर मारला. कॅप्टन पोलार्डची खेळीने मात्र, एमआयला विजय मिळवून देता आला नाही. दुबईने एमआय एस्टिमेट्सचा 16 धावांनी पराभव केलाय. मात्र, सध्या पोलार्डच्या खेळाची चर्चा होताना दिसते. शेर बूढा जरूर हुआ है, पर शिकार करना नहीं भूला, असं त्याचे चाहते म्हणाताना दिसत आहेत.