Lionel messi assam connection: फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वांत रोमहर्षक आणि श्वास रोखून धरायला लावणारा फायनल (fifa world cup final 2022) सामना झाला. अर्जेंटीनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये (Penalty Shootout) फ्रान्सचा पराभव तब्बल 36 वर्षांनी वर्ल्डकपवर हाताचे ठसे उमटवले. अंतिम सामन्यात तीन गोल करत मेस्सीने (Magical Messi) आपली जादू दाखवून दिली आणि स्वप्न पुर्ण केलं. त्यानंतर अवघं जग मेस्सीमय झाल्याचं दिसून येतंय. सर्व जगातून मेस्सीवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता काँग्रेस खासदाराचं (Congress MP Abdul Khaleque) ट्विट सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
आसामचे काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांनी मेस्सीचं ट्विट (Congress MP Abdul Khaleque Tweet) करत अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी मेस्सीचं आसाम कनेक्शन (Assam connection) असल्याचं म्हटलं. त्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. मेस्सी आणि आसामचा काय संबंध? असा सवाल अनेकांना पडला. ट्विटरवर चर्चा सुरू असताना अब्दुल खलेक (Abdul Khaleque On Messi) यांनी अकलेचे तारे तोडले. (lionel messi assam connection Assam congress mp abdul khaleque tweet fifa world cup final 2022 Marathi News)
आणखी वाचा - फक्त Messi नाही तर Google ने देखील मोडला 25 वर्षांचा रेकॉर्ड; Sundar Pichai म्हणतात...
मेस्सी मनापासून अभिनंदन. तुमच्या आसाम कनेक्शनबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे, असं अब्दुल खलेक यांनी म्हटलं. त्यावर एका ट्विटर युझरने आसाम कनेक्शन? असा सवाल विचारला. त्यानंतर अब्दुल खलेक यांनी या ट्विटला प्रत्युत्तर दिलं. हो, मेस्सी आसाममध्ये (Messi Assam Connection) जन्मला आहे, असं उत्तर अब्दुल खलेक यांनी दिलं.
assam connection?
— Aditya Sharma (@strangecrickkk) December 19, 2022
दरम्यान, आपली चूक लक्षात आल्यानंतर काँग्रेस खासदाराने ट्विट (Abdul Khaleque Tweet) डिलीट केलं आणि आणखी एक पोस्ट करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मी सर्वांना विनंती करतो की, अफवा पसरवण्याआधी त्यांनी माझ्या ट्विटर हँडलची आणि अधिकृत फेसबुक पेजची टाइमलाईन तपासावी, असं अब्दुल खलेक म्हणाले. मात्र, तोपर्यंत त्यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट मेस्सीपर्यंत पोहोचला असावा.