मिचेल स्टार्कचा भाव गडगडला , गेल्यावर्षी 24 कोटी तर यंदा फक्त एवढ्या पैशांवर मानावं लागलं समाधान

Mitchell Starc IPL 2025 Mega Auction : ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कवर गेल्यावर्षी आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये तब्बल 24.75 कोटींची बोली लागली होती. 

पुजा पवार | Updated: Nov 24, 2024, 06:45 PM IST
मिचेल स्टार्कचा भाव गडगडला , गेल्यावर्षी 24 कोटी तर यंदा फक्त एवढ्या पैशांवर मानावं लागलं समाधान title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 Mega Auction : सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आयपीएल 2025 (IPL 2025) चं मेगा ऑक्शन पार पडत आहे. यंदा ऑक्शनमध्ये तब्बल 577 खेळाडूंवर बोली लागणार असून या ऑक्शनवर कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळते, आपला आवडता खेळाडू कोणत्या संघात जातो हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कवर गेल्यावर्षी आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये तब्बल 24.75 कोटींची बोली लागली होती. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याचा भाव कोसळला आहे. 

24 कोटींवरून एवढ्या खाली कोसळली किंमत : 

आयपीएल 2024 च्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क याच्यावर कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटींची बोली लावून विकत घेतले होते. यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याने केकेआरसाठी आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या. मात्र केकेआरने त्याला रिटेन केलं नाही आणि त्यामुळे त्याला पुन्हा ऑक्शनमध्ये उतरावे लागले. स्टार्कने स्वतःला 2 कोटींच्या बेस प्राईजवर ऑक्शनमध्ये ठेवले. स्टार्क जेव्हा ऑक्शनमध्ये आला तेव्हा त्याला यंदाही जास्त बोली मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र  तसं झालं नाही. स्टार्कला घेण्यासाठी अवघ्या काहीच संघांनी रस दाखवला. अखेर दिल्ली कॅपिटल्सने स्टार्कवर 11.75 कोटींची बोली लावून विकत घेतले. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली घेणाऱ्या खेळाडूला 11.75 कोटींवर समाधान मानावे लागले. 

हेही वाचा : ना चेन्नई ना दिल्ली, ऋषभ पंतवर 'या' टीमने लावली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली

दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट : 

दिल्ली कॅपिटल्स  - अक्षर पटेल (16.5 कोटी), कुलदीप यादव (13.25 कोटी), ट्रिस्टन स्टब्स (10 कोटी), अभिषेक पोरेल (4 कोटी)