India vs New Zealand 2023 : एक साध्या रिक्षावाल्याचा पोरगा... हैदराबादमध्ये लहानाचा मोठा झाला. एकेकाळी रस्त्यावरच्या टीव्हीच्या दुकानाबाहेर टाचा वर करून मॅच बघणारा सिराज (Mohammed Siraj) आज टीम इंडियामध्ये खेळतोय. वडील 70 रुपये पॉकेटमनी द्यायचे, त्यातच सगळं काही भागवायचं. सिराजला फक्त आणि फक्त क्रिकेट (Cricket) येड. कधी काळी टीम इंडियासाठी (Team India) खेळायचं स्वप्न पाहिलं आणि आज हाच सिराज भल्या भल्या फलंदाजाच्या दांड्या गुल करतोय. मोहम्मद शमीसाठी भारत आणि न्यूझीलंडविरुद्धचा (India vs New Zealand ) पहिला सामना खास राहिला. त्याला कारण होतं, त्याच्या कुटुंबाची हजेरी. (mohammed siraj mother shabana begum on siraj father after india vs new zealand odi match in hyderabad marathi news)
मियां भाई (Mian Bhai) म्हणून फेमस असलेल्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) घरच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना खेळला. होम ग्राऊंडवर सिराजने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. 10 ओव्हरमध्ये सिराजने 46 धावा देत 4 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. संपुर्ण कुटूंब (Mohammed Siraj Family) देखील हा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले होते. त्यामुळे हा सिराजसाठी खुपच सुवर्णक्षण होता.
A perfect and eventful day for @mdsirajofficial, who played his first international game at his home ground and had his family watching him sparkle for #TeamIndia with the ball
Watch as his friends and family share their thoughts #INDvNZ pic.twitter.com/AXPVWbxs9z
— BCCI (@BCCI) January 18, 2023
सिराजला मैदानावर पाहिल्यानंतर कुटुंबिय भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर सामन्यानंतर सिराजच्या आईने (Mohammed Siraj Mother) लेकाचं कौतूक केलं. प्रसिद्धी मिळाल्यानंतर सिराज बदलला नाही. परिवारातील सर्वांची तो काळजी करतो. त्याचे वडील (Mohammed Siraj father) आज जिवंत असते तर त्यांना गर्व वाटला असता, असं सिराजच्या आई (shabana begum) म्हणाल्या आहेत. मैदानावर आलेल्या सिराजच्या बहिणीने (Mohammed Siraj Sister) तिचा आयफोन देखील दाखवला, जो सिराजने तिला गिफ्ट दिला होता.
आणखी वाचा - Ind vs Nz : मोहम्मद सिराजसाठी सुवर्णक्षण! अख्खं कुटूंब सामना पाहण्यासाठी मैदानात अवतरलं
दरम्यान, सोमवारी अचानक सिराज घरी (Mohammed Siraj Family) पोहोचला होता. त्यावेळी मला खूप आश्चर्य वाटलं. मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीची खिचडी बनवली होती, असंही सिराजच्या आईने सांगितलं. प्रत्येक विकेटनंतर सिराज आजही आभाळाकडे बघतो. त्याला कारण त्याचे वडील. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2020 साली नोव्हेंबर महिन्यात सिराजच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यावेळी वडिलांचं अंतिम दर्शन न घेताच सिराज ऑस्ट्रेलियाला परतला होता. त्यामुळे तो आजही वडिलांच्या आठवणीत आभाळाकडे पाहतो.