''फक्त स्पीड असून फायदा नाही...'', आफ्रीदीचं Umran Malik वर मोठं विधान

भारताचा वेगवाग गोलंदाज उमरान मलिकच्या गोलंदाजीची खुप चर्चा आहे. 

Updated: Jun 3, 2022, 10:04 PM IST
''फक्त स्पीड असून फायदा नाही...'', आफ्रीदीचं Umran Malik वर मोठं विधान  title=

मुंबई  : भारताचा वेगवाग गोलंदाज उमरान मलिकच्या गोलंदाजीची खुप चर्चा आहे. आयपीएलमधील त्याच्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले होते. भारताच्या माजी खेळाडूंसह इतर खेळाडूंनीही त्याचे कौतूक केले होते. शोएब अख्तरशी मध्यंतरी त्याची तुलना झाली होता. आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रीदीने त्याच्यावर मोठे विधान केले आहे. 

काय म्हणाला शाहिन आफ्रीदी?
आयपीएलमधील लॉकी फर्ग्युसन आणि उमरान मलिक यांच्या वेगवान गोलंदाजीबद्दल शाहिन आफ्रीदीला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आफ्रीदी म्हणाला, जर तुमच्याकडे लाईन, लेंथ आणि स्विंग नसेल तर वेग तुम्हाला मदत करू शकत नाही. त्यामुळे एकप्रकारे त्याच्या वेगवान गोलंदाजीवर टीका केल्याचे बोलले जात आहे. 

उमरानचा विक्रम मोडला
उमरान मलिक आणि न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन यांनी नुकत्याच संपलेल्या IPL 2022 मध्ये अतिशय वेगवान गोलंदाजी केली. स्पर्धेत, दोन्ही गोलंदाजांनी 150 किमी/तास पेक्षा जास्त वेगाने बॉल टाकला. गुजरात-राजस्थान यांच्यातील अंतिम सामन्यात फर्ग्युसनने १५७.३ किमी/तास वेगाने चेंडू फेकून उमरानचा विक्रम मोडला. त्याने टाकलेल्या एका बॉलमुळे उमरानचा विक्रम मोडला गेला.