T20 World Cup 2024 साठी पाकिस्तानचा मास्टर प्लॅन तयार, कॅप्टन शाहीन म्हणतो 'अखेर तोडगा निघाला...'

T20 World Cup 2024 : पाकिस्तानला अखेर सलग 8 पराभवानंतर विजय मिळवण्यात यश आलं आहे. अशातच संघातील अंतर्गत कुडघोडी वाढत असताना पाकिस्तानचा कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) मोठं वक्तव्य केलंय.

सौरभ तळेकर | Updated: Jan 21, 2024, 03:49 PM IST
T20 World Cup 2024 साठी पाकिस्तानचा मास्टर प्लॅन तयार, कॅप्टन शाहीन म्हणतो 'अखेर तोडगा निघाला...' title=
Shaheen Afridi, T20 World Cup 2024

Shaheen Afridi On T20 World Cup : न्यूझीलंड दौऱ्यावर असलेला पाकिस्तानी संघाची (Pakistan Cricket Team) चांगलीच नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. आधी ऑस्ट्रेलिया आणि आता न्यूझीलंडकडून दारूण पराभवाचा सामना पाकिस्तानच्या संघाला करावा लागला. पाच सामन्यांची टी-20 मालिका पाकिस्तानला गमवावी (NZ vs PAK) लागली. अखेरच्या सामन्यात अटीतटीच्या विजयाने पाकिस्तानने लाज राखली खरी मात्र, पाकिस्तान संघाचं पितळ उघडं पडल्याचं दिसून आलंय. अशातच आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2024) पाकिस्तान संघाने तयारी केली आहे. त्यावर पाकिस्तानचा कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) याने मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाला Shaheen Afridi?

पाकिस्तानचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने खुलासा केला की, न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील कामगिरीनंतर आम्ही 16 ते 20 खेळाडूंची निवड केली आहे. काही खेळाडूंनी या सिरीजमध्ये उत्तम कामगिरी केली. मात्र, संघ म्हणून आम्ही कमी पडलो. त्याचा परिणाम आगामी मोठ्या सिरीजमध्ये पडू नये, असं आम्हाला वाटतं. अंतिम संघ निवडताना आम्ही याचा विचार करू, असं कॅप्टन शाहीन शाह शाह आफ्रिदीने म्हटलं आहे. त्यावेळी त्याने इफ्तिकार अहमदचं कौतूक देखील केलं. इफ्तिखार अहमदने आपल्या ऑफ-स्पिनसह अशा ट्रॅकवर चमकदार कामगिरी केली. शाहीनने अनुभवी फिरकीपटूचं त्याच्या योगदानाबद्दल कौतुक देखील केलंय.

इफ्तिखार हा खूप अनुभवी खेळाडू आहे आणि तो नेहमीच गोलंदाजीसाठी तयार असतो पण आम्हाला प्रत्येकाला योग्य संधी द्यायची होती म्हणून आम्ही या मालिकेत तरुणांना संधी देण्याचा विचार करत होतो. त्यामुळे आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आम्हाला तयारी करता आली. येत्या काळात युवा खेळाडूंवर आमचा संध अवलंबून असेल, असंही शाहीन शाह आफ्रिदीने म्हटलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानला अखेर सलग 8 पराभवानंतर विजय मिळवण्यात यश आलं आहे. पाकिस्तानने न्यूझीलंड विरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या टी -0 सामन्यात यशस्वीरित्या 135 धावांचा बचाव केला अन् वर्ल्ड कपनंतरचा पहिला विजय मिळवला आहे. पाकिस्तानकडून कॅप्टन शाहिन आफ्रिदी आणि मोहम्मद नवाझ यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीमध्ये रिझवान आणि फखर झमान यांनी चमकदार कामगिरी केली होती.

पाकिस्तानचा संभाव्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप संघ -  शाहीन अफ्रिदी (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), हसीबुल्ला खान, बाबर आझम, फखर जमान, साहिबजादा फरहान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, अब्बास अफ्रिदी आणि जमान खान.