Rahul Dravid On Virat Kohli : पहिल्या टेस्ट सामन्यात झालेला पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा बेझबॉलची हवा काढली अन् वचपा काढला. अशातच आता आगामी सामना हा मालिकेचा कौल ठरवणार आहे. अशातच आता आगामी तिसऱ्या सामन्यात (India vs England 3rd Test) कोण बाजी मारणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता टीम इंडियाचा धुरंधर विराट कोहली (Virat Kohli) खेळणार की नाही? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आता टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी यावर उत्तर दिलंय.
काय म्हणाले Rahul Dravid ?
मला वाटते की सिलेक्टर्सला विचारणं योग्य ठरेल. मला खात्री आहे की, ते पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी संघ निवडण्यापूर्वी उत्तर देण्यास तयार असतील. आम्ही त्यांच्याशी याबद्दल बोलू. मला खात्री आहे की पुढील काही दिवसात निवड होईल. आम्ही कोहलीशी बोलू आणि पुढे काय होणार आहे ते जाणून घेऊ, असं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.
सौरव गांगुलीच्या प्रश्नावर द्रविड म्हणतो...
साहजिकच भारतातील खेळपट्ट्यांवर बॉल वळेल. पण बॉल किती वळेल, याबाबत मी तज्ञ नाही. भारतातील खेळपट्ट्या कोणत्या चार किंवा पाच दिवसांच्या कालावधीत बदल होतो, असं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे. कधीतरी असं वाटतं की, चेंडू तिसऱ्या दिवसापासून वळेल, परंतु बॉल पहिल्या दिवसापासूनच वळण्यास सुरुवात होते. आम्हाला जी काही खेळपट्टी मिळेल, त्यावर आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो, असंही कोच द्रविड यांनी म्हटलं आहे.
Rahul Dravid Sir about Shubman.
"We have a lot of confidence in Shubman, we know his class and ability."@ShubmanGill#ShubmanGill pic.twitter.com/LhWGq9nZqA
— mish (@thoughtsofshub) February 5, 2024
इशान किशन सध्या कुठं आहे? आणि तो टीम इंडियामध्ये कधी परतणार? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी इशान किशनला कडक शब्दात इशारा दिला आहे. इशानला सतत खेळावं लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील इशान किशनच्या सतत संपर्कात आहे. त्यानंतरच त्याला संघात घेण्याचा विचार केला जाईल, असं म्हणत राहुल द्रविड यांनी सुचक वक्तव्य केलं होतं.