Rohit Sharma Press Conference Before IND VS BAN Test Match : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. 19 सप्टेंबर पासून या सीरिजला सुरुवात होणार असून पहिल्या टेस्ट सामन्याकरता बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. यात अनेक नव्या तसेच अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. बांगलादेशच्या टीमने नुकतेच पाकिस्तानला टेस्ट सीरिजमध्ये हरवले आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. 19 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्ट सीरिजमध्ये बांगलादेशचा पराभव करण्यासाठी रोहित आणि गंभीर कोणत्या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रोहित शर्माने टेस्ट सीरिजपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत प्लेईंग 11 बाबत मोठा खुलासा केला आहे.
टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर श्रीलंके विरुद्ध वनडे आणि टी 20 सिरीज खेळली. यानंतर तब्बल एका महिन्याच्या ब्रेकनंतर टीम इंडिया टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी उतरणार आहे. रोहित शर्माने म्हंटले की एक महिन्यांनी मैदानावर पुनरागमन करताना खुलं चांगलं वाटतंय. आम्ही या टेस्ट सीरिजसाठी चांगला सराव केला असून आता मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.
हेही वाचा : अलिशान बंगला, रोल्स रॉईससारख्या लक्झरी कार... आर अश्विन आहे इतक्या संपत्तीचा मालक?
कर्णधार रोहित शर्माने बांगलादेश टेस्ट सीरिजपूर्वी पत्रकार परिषदेत प्लेईंग 11 बाबत त्याचं मत मांडलं. तो म्हणाला, "प्लेईंग 11 निवडण्याबाबत काही गोष्टी या सरळ असतात ज्याच्यावर आमचा फोकस असतो. यात खूप जास्त विचार करण्याची गरज नसते. जेव्हा आम्ही प्लेईंग 11 निवडतो तेव्हा पाहतो की खेळाडूने आधी कसं परफॉर्म केलंय. रन, विकेट, एका खेळाडूचा अनुभव आणि खेळाडूचा प्रभाव या आधारावर आम्ही चर्चा करतो. काही गोष्टी तुमच्या समोर असतात. जेव्हा आम्ही भारतासाठी शेवटची टेस्ट सिरीज खेळली होती तेव्हा अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होते तर काही उपलब्ध नव्हते, त्यामुळे ते खेळू शकले नाहीत. काही खेळाडू अजूनही दुखापतग्रस्त आहेत. काही एनसीएमध्ये आहेत. प यावेळी जास्तीत जास्त चांगले खेळाडू आमच्या सोबत आहेत. आम्हाला या सीरिजमध्ये कसे खेळायचे आहे, कशा प्रकारे सिरीज जिंकायची आहे याच्या आधारावर प्लेईंग 11 निवडवावी लागेल".
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 आणि 27 सप्टेंबर रोजी दोन सामन्यांची टेस्ट सिरीज पार पडणार आहे. तर त्यानंतर दोन्ही संघांमध्ये टी 20 सिरीज सुद्धा खेळवण्यात येईल. यातील पहिला सामना हा 6 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशच्या स्टेडियममध्ये पार पडेल.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.