मुंबई : यंदाची आयपीएल आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या सिझनचे आता अवघे काहीच सामने बाकी असून आज मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. आता मुंबई इंडियन्स म्हटलं की, टीमच्या प्लेईंग 11 मध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश करणार का? हा एकमेव प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येतोय.
अर्जुन तेंडुलकरचा मुंबईच्या टीमचमध्ये समावेश करण्याबाबत सोशल मीडियावर एक चर्चा सुरु झाली. यावेळी एका युझरने, रोहित स्वत:ला विश्रांती देऊन अर्जुन तेंडुलकरला कर्णधार बनवण्याचा विचार करत असल्याचं म्हटलंय. तर अजून एका युझरने, अर्जुन तेंडुलकर दिल्लीविरूद्ध खेळवलं पाहिजे.
Meanwhile Rohit thinking of resting himself and making Arjun Tendulkar captain... https://t.co/GOCMdNwtdz
— Harsh Raikar (@bitter_parker_) May 19, 2022
Arjun Tendulkar deserve atleast one chance to play.. he should replace bumrah tonight..
— (@sabarirajan94) May 21, 2022
Arjun Tendulkar deserves to play against DC @mipaltan pic.twitter.com/89b1L6EWAG
— (@AvengerReturns) May 19, 2022
अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला रिप्लेस करण्यासाठी तयार असल्याचं एका युझरने म्हटलं आहे.
मुंबईचा या मोसमातील शेवटचा सामना हा आज दिल्ली (Delhi Capitals) विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. मुंबईच्या या शेवटच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळू शकते.
अर्जुन मुंबई टीममध्ये 2021 पासून आहे. मुंबईने अर्जुनला 2021 मध्ये 20 लाख रुपयात गोटात घेतलं होतं. तर या 15 व्या मोसमासाठी अर्जुनला 10 लाख रुपये वाढवून दिले. मुंबई फ्रँचायजीने अर्जुनसाठी या मोसमात 30 लाख रुपये मोजले.