Sachin Tendulkar and Anjali love story : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि अंजली मेहता (Anjali Mehta) यांची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. एअरपोर्टवर पहिल्यांदाच एकमेकांना पाहणे आणि नेहमी नेहमी भेटण्यासाठी मित्रांची मदत घेणे, असा दोघांचा नित्यक्रम सुरु होता. या भेटीतच त्यांचे प्रेम अधिक फुलले.
सर्वात आधी भेट झाली ती विमानतळावर. 1990 मध्ये सचिनपेक्षा जवळपास 6 वर्षांनी मोठी असलेली अंजली पहिल्यांदा एअरपोर्टवर सचिनला पाहताच त्याच्या प्रेमात पडली होती. अंजली हिने सचिनला पहिल्यांदा 1990 मध्ये मुंबई एअरपोर्टवर पहिल्यांदा पाहिले. तेव्हा सचिन पहिल्या इंग्लंड दौऱ्यावरुन मायदेशी आला होता. एअरपोर्टवर अंजलीदेखील आईला घेण्यासाठी पोहोचली होती. अंजली आईची वाट पाहात होती. तेवढ्यात तिची नजर सचिनवर पडली आणि ती त्याला पाहतच राहिली. मात्र जेव्हा तिला कळले की, इंग्लंडविरुद्ध नुकतीच शतकी खेळी करणारा हाच तो भारताचा युवा क्रिकेटर आहे. तेव्हा ती एयरपोर्टवरच त्याच्या मागे पळत गेली हेती. एका मुलीला आपल्यामागे पळताना पाहून सचिन एकदम लाजला. एवढेच नाही तर तो लाजतच कारमध्ये बसला होता.
आता अंजली हिला सचिन याच्याशी बोलायचे होते आणि भेटण्याची इच्छा होत होती. मित्रांच्या माध्यमाने तिने सचिनचा फोन नंबर मिळवला आणि ती त्याच्याशी बोलली. अंजलीने सचिनला सांगितले की, मी आपल्याला एअरपोर्टवप पाहिले होते. यावर सचिननेही म्हटले हो. मी पण तुला पाहिले. माझ्या मागे पळत होतीस तू. त्यानंतर सचिनला भेटण्यासाठी चक्क पत्रकार होऊन अंजली त्याच्या घरी पोहोचली होती.
सचिन आणि अंजलीच्या मैत्रीला नुकतीच सुरुवातच झाली होती. अंजलीने एका इंटरव्यूमध्ये हा किस्सा सांगीतला होता. ती म्हणाली होती की, एकदा सचिनला भेटण्यासाठी ती स्वतःला पत्रकार सांगूण त्याच्या घरी पोहोचली होती. घरी अचानकपणे एक महिला पत्रकार आल्यामुळे तेव्हा सचिनचे कुटुंबीय चकित झाले होते. सचिनच्या आईने अंजलीला विचारले की, तू खरोखरच पत्रकार आहेस? या आधी सचिनच्या आईने सचिनला अंजलीला चॉकलेट गिफ्ट देताना पाहिले होते. या मुळेच त्यांना शंका आली होती.
सचिन त्यावेळी 15 वर्षांचा होता. अंजली आणि सचिन यांचे प्रेम साधारणपणे पाच वर्ष चालले. मे, 1995 मध्ये सचिन-अंजलीचा विवाह झाला. या लग्नाला काही निवडक लोकांनाच निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी 22 वर्षांचा सचिन जगात स्टार झाला होता.
अंजली तेंडुलकर यांनी आपला व्यवसाय डॉक्टरकीमध्ये सुरु केला होता. परंतु आपला पती आणि मुलांसाठी वेळ देण्याचे जेव्हा त्यांनी ठरवले, तेव्हा त्यांनी हा व्यवसाय सोडला आणि आपल्या कुटुंबीयांसाठी आपला वेळ दिला. अंजली तेंडलुकर या सचिन तेंडुलकर यांची लाइव्ह मॅच पाहू शकत नसल्यामुळे त्या मॅचची रेकॉर्ड पाहात असत. भारतातील आदर्श स्त्री पत्नी म्हणून अंजली तेंडुलकर यांना ओळखले जाते. त्यांनी आपला मोलाचा वेळ आपल्या कुटुंबासाठी मुलांसाठी खर्च केला. या दोघांना सारा आणि अर्जुन ही दोन मुलं आहेत.