IND VS NZ 2nd Test Pune : पुण्यात गुरुवारपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना 259 धावा केल्या. तर टीम इंडियाने दिवसाअंती 1 विकेट्स गमावून 16 धावा करू शकली. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा त्याच्या धडाकेबाज फलंदाजी सह मैदानातील त्याच्या आक्रमकतेसाठी सुद्धा ओळखला जातो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात पुणे टेस्ट दरम्यान विराट न्यूझीलंडचा खेळाडू टीम साऊदी (Tim Southee) याच्याशी भिडताना दिसत आहे.
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टेस्ट सामान खेळवला जात आहे. 24 ऑक्टोबर रोजी सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांमध्ये झालेला टॉस हा न्यूझीलंडने जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी निवडली. यावेळी भारताकडून आर अश्विनने 3 तर वॉशिंग्टन सुंदरने 7 विकेट्स घेऊन न्यूझीलंडला 259 धावांवर रोखलं. न्यूझीलंडची इनिंग संपल्यावर विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये जात असताना त्याचा सामना हा न्यूझीलंडचा खेळाडू टिम साउदीशी झाला. विराट ड्रेसिंग रूममध्ये जात होता तर टिम साउदी मैदानात जात होता. यावेळी साऊदीने विराटचा हात पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण विराटने त्याचा हात झटकला आणि त्या दोघांमध्ये मजा मस्तीत थोडी धक्काबुक्की झाली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहताना असे वाटेल की दोन्ही खेळाडू भांडतायत पण ते दोघे खोडकरपणे एकमेकांची मजा घेत होते.
Virat Kohli having fun with Tim Southee indvsnzl INDvNZ INDvsNZ pic.twitter.com/wsAOGCNa8z
— Tejash (Cricmemer45) October 25, 2024
पहिल्या दिवसाअंती न्यूझीलंड 243 धावांच्या आघाडीवर होते. टीम इंडियाने 1 विकेट गमावून केवळ 16 धावा केल्या होत्या. त्यामुळे विराटसह टीम इंडियाचे इतर स्टार फलंदाज दुसऱ्या दिवशी फलंदाजीत मोठी कामगिरी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. विराट कोहली 9 बॉलचा सामना करून केवळ 1 धाव करून बाद झाला. सॅंटनरने त्याला बोल्ड आउट केले. यापूर्वी बंगळुरू टेस्टमध्ये देखील पहिल्या इनिंगमध्ये विराट कोहली शुन्यावर आउट झाला होता.
हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेची WTC पॉईंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, विजयासाठी भारतावर दबाव वाढला
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप.