Team India मध्ये Virat ची जागा धोक्यात, कोहलीच्या जागेवर या खेळाडूने ठोकला दावा

Shreyas Iyer statement about 3rd place : भारतीय संघात गेल्या काही सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना अधिक संधी दिली जात आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून बीसीसीआयने तयारी सुरु केली आहे. त्यामुळे संघात आपली जागा पक्की करण्यासाठी स्पर्धा आणखी वाढली आहे.

Updated: Feb 28, 2022, 02:55 PM IST
Team India मध्ये Virat ची जागा धोक्यात, कोहलीच्या जागेवर या खेळाडूने ठोकला दावा title=

मुंबई : माजी कर्णधार विराट कोहलीला भारत आणि श्रीलंका (IND vs SL) दरम्यान खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या घरच्या T20 मालिकेत विश्रांती देण्यात आलीये. त्यानंतर युवा फलंदाज श्रेयस अय्यरने त्याच्या जागी नंबर-3 वर संघाकडून फलंदाजी केली आणि संधीचा फायदा घेत मालिकेतील 3 सामन्यात एकूण 204 धावा केल्यात. त्यानंतर त्याला प्लेयर ऑफ द सिरीजचा किताबही मिळाला. त्यानंतर आता श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने मोठे वक्तव्य केलंय.

भारत आणि श्रीलंका (Ind vs SL T20I) यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत अय्यरच्या फलंदाजीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीलंकेचे गोलंदाज त्याला एकदाही बाद करू शकले नाहीत. त्यानंतर आता श्रेयस अय्यरने यापुढेही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विराट कोहली गेल्या अनेक वर्षांपासून याच क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्यामुळे आता अय्यरने केलेले हे विधान कुठेतरी वादाचे रूपही घेऊ शकते. (Shreyas Iyer wants to play on 3rd place)

प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब घेताना अय्यर म्हणाला की, वैयक्तिकरित्या, माझ्यासाठी सर्वोत्तम स्थान क्रमांक तीन आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये फक्त 3 नंबरचा बॅट्समनच आपल्या इनिंगचे उत्तम नियोजन करू शकतो. अन्यथा, जर तुम्ही क्रमाने फलंदाजी केली तर तुमच्याकडे वेळ नाही आणि तुम्हाला पहिल्या चेंडूपासूनच जलद धावा कराव्या लागतील.

संघात खूप स्पर्धा आहे : श्रेयस अय्यर

अय्यरने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 28 चेंडूत 57 धावा केल्या होत्या, दुसऱ्या टी20 सामन्यात 44 चेंडूत 74 धावा केल्या होत्या आणि तिसऱ्या टी20 सामन्यातही अय्यरचे वादळ थांबले नाही आणि त्याने 45 चेंडूत 73 धावा केल्या. मात्र, संघात मिळणार्‍या संधीचा फायदा उठवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचेही तो म्हणाला.

अय्यर म्हणतो की, 'संघात खूप स्पर्धा आहे आणि सर्व खेळाडू सामने जिंकण्यास सक्षम आहेत. वैयक्तिकरित्या, मला प्रत्येक क्षण आणि संधीचा आनंद घ्यायचा आहे. मला सामना संपवायला आवडतो आणि मी नेहमी याच मानसिकतेने खेळपट्टीवर जातो.'