मुंबई : हैदराबाद टीमने सुरुवातीला सामने गमवाले असले तरी केनच्या नेतृत्वामध्ये दमदार फॉर्ममध्ये टीम पुन्हा मैदानात परतली आहे. हैदराबाद टीमने कोलकातावर विजय मिळवला. कोलकाता टीमचा हा तिसरा पराभव आहे. कॅप्टन श्रेयस अय्यरला 7 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला.
हैदराबाद टीमने कोलकातावर रोमांचक विजय मिळवला. कोलकाताच्या हातून विजय खेचून आणत हैदराबादने तो आपल्या नावे केला. कोलकातामध्ये हिरो खेळाडू काही क्षणात झिरो झाला. त्याच्यामुळे सामना पराभूत झाल्याच्या सोशल मीडियावर चर्चा आहेत. याबाबत आता श्रेयस अय्यरने मोठं विधन केलं आहे.
आयपीएलच्या 15 व्या हंगामातील कोलकाताचा हा तिसरा आणि सलग दुसरा पराभव आहे. या पराभवानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, 'खूप थकल्यासारखे वाटत आहे. मला वाटतं की आम्ही बोर्डावर चांगली धावसंख्या ठेवू. खरं बोलायचं तर राहुल त्रिपाठीने सगळा घोळ घातला. त्याच्या गडबड करण्याचा फटका टीमला बसला.
हैदराबादच्या बॉलर्सनी मिळालेल्या संधीचा फायदा उचलला. आम्ही बॅटिंगमध्ये चांगला प्रयत्न केला. तरी आम्ही बॉलिंगमध्ये खूप कमी पडलो. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर बॉलर्सवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं.
केनकडून खेळाडूंचं कौतुक
हैदराबाद टीमला सलग तिसरा विजय मिळाला आहे. या विजयामुळे केन विल्यमसन खूप जास्त खूश आहे. प्ले ऑफमध्ये विकेट काढणं आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं. दवामुळे थोडं कठीण होतं मात्र अशक्य नाही. डेथ बॉलिंगही खूप जबरदस्त झाली.
भुवी, मार्को, एडेन राहुल त्रिपाठीनं जबरदस्त कामगिरी केल्याचं केननं सांगितलं. याच्या कौशल्याचं कौतुकही यावेळी केननं केलं. हैदराबाद टीम 5 सामने खेळली आहे. त्यापैकी 3 सामने जिंकले असून 2 पराभूत झाली आहे. तर कोलकाता टीम 6 पैकी 3 सामने जिंकले तर 3 पराभूत झाले आहेत.