इथे झाली चूक...; अखेर केन विलियम्सनने सांगितलं हैदराबादच्या पराभवाचं कारण

पहिल्याच सामन्यान राजस्थान रॉयल्सकडून केन विलियम्सनच्या टीमला पराभवाला सामोरं जावं लागलंय.

Updated: Mar 30, 2022, 08:03 AM IST
इथे झाली चूक...; अखेर केन विलियम्सनने सांगितलं हैदराबादच्या पराभवाचं कारण title=

पुणे : आयपीएलच्या 15 व्या सिझनमधील पहिला सामना सनरायझर्स हैदराबादसाठी काही खास ठरला नाही. पहिल्याच सामन्यान राजस्थान रॉयल्सकडून केन विलियम्सनच्या टीमला पराभवाला सामोरं जावं लागलंय. गेल्या सिझनमध्ये तळाला असलेली सनराझर्स हैदराबाद यंदा चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. दरम्यान यावर हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने प्रतिक्रिया दिली आहे.

सामन्यानंतर केन विलियम्सन म्हणाला की, आम्ही गोलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. त्यावेळी आम्हाला चांगली संधी मिळाली. सुरुवातीला  स्विंगमुळे मदत मिळत होती. पण, नंतर काही गोष्टी कठीण झाल्या. पिच चांगलं होतं त्यामुळे त्यांना रोखणं अधिक कठीण झालं. पण राजस्थानची टीम खूप चांगली खेळली.

केन पुढे म्हणाला की, एक टीम म्हणून आम्हाला अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. चिन अप होऊन आम्हाला पुढील सामन्यांना सामोरं  जायचं आहे. 

नो बॉलबाबत विलियम्सन म्हणाला की, नो बॉल संदर्भात आम्ही नक्कीच काळजी घेऊ. उमरान मलिककडे गोलंदाजीसाठी खूप चांगला वेग आहे. तो तरुण आहे, त्याला गेल्या वर्षी काही अनुभव मिळाला जो खरोखरच मोलाचा. मला खात्री आहे की तो अजून चांगली कामगिरी करेल.

कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 210 रन्स केले. हे लक्ष्य गाठताना हैदराबादची टीम 7 विकेट्स गमावत 149 रन्सवर गारद झाली. अशाप्रकारे राजस्थानने 61 रन्सनी मोठा विजय मिळवत सामना जिंकला.