Steve Smith : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England v Australia ) यांच्यामध्ये सध्या अॅशेज सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील पहिला सामना एजबेस्टनमध्ये ( Edgbaston test ) खेळवण्यात येतोय. आज या सामन्याचा पाचवा दिवस असून पावसामुळे हा सामना उशीराने सुरु होणार आहे. तिसरा दिवस सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टीमला जिंकण्यासाठी 174 रन्सची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे इंग्लंडला जिंकण्यासाठी 7 विकेट्सची गरज आहे. दरम्यान या सामन्यावेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल ( Social Media video viral ) होतोय, ज्यामध्ये इंग्लंडचे चाहते बॉल टॅम्परींगच्या मुद्द्यावरून ऑस्ट्रेलिया टीमचा फलंदाज स्टीव स्मिथ ( Steve Smith ) ला चिडवताना दिसतायत.
अॅशेस सिरीजच्या पहिल्या सामन्यावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England v Australia ) या दोघांची पकड असल्याचं दिसून येतंय. या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना स्टीव स्मिथ ( Steve Smith ) बाऊंड्री लाईनवर फिल्डींग करत होता. यावेळी इंग्लंडच्या चाहत्यांनी सँडपेपरच्या प्रकरणाला उजाळा देत त्यासंदर्भात गाणं गाण्यास सुरुवात केली.
बॉल टॅम्परिंगनंतर ( Ball tampering ) घेतलेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये स्टीव स्मिथने ( Steve Smith ) आपल्या देशाची माफी मागितली होती. यावेळी स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांनी त्यांच्या गाण्यामध्ये, याच गोष्टीचा उल्लेख केला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यावेळी चाहत्यांनी स्मिथला ( Steve Smith ) प्रचंड ट्रोल केलं.
2018 साली दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना खेळवण्यात येत होता. केपटाऊनमध्ये रंगलेल्या या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज बेनक्राफ्ट बॉलसोबत छेडछाड करत होता. यावेळी ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटने बॉल टॅम्पिरिंगच्या प्रकरात कठोर पावलं उचलली होती.
यावेळी ऑस्ट्रेलिया टीमच्या कर्णधारपदाची धुरा स्टीव स्मिथकडे ( Steve Smith ) होती आणि उपकर्णधारपद डेव्हिड वॉर्नरकडे होतं. या प्रकरणानंतर स्मिथने पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली होती. शिक्षा म्हणून स्मिथवर एका वर्षाची तर वॉर्नरवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यामध्ये स्टीव स्मिथची बॅट चांगलीच तळपली होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने 121 रन्सची खेळी केली होती. मात्र अॅशेज सिरीजमध्ये स्मिथ फेल गेलेला दिसतोय. यावेळी पहिल्या डावात 16 आणि दुसऱ्या डावात अवघे 6 रन्स केलेत.