नवी दिल्ली : रंगारंग सोहळ्याने जोरदार स्वागत झाल्यावर Winter Olympics Day 2018च्या उत्साह क्षणाक्षणाला वाढत आहे. आता तर खेळाडूंनी पदकेही मिळवायला सुरूवात केली असून, स्वीडनच्या कॅरोलेटने शानदार खेली करत खाते खोलले आहे.
कॅरोलेटने सुवर्ण पदक जिंकत जोरदार ओपनींग केले.कॅरोलेटने पहिल्याच दिवशी महिलांच्या क्रॉस कंट्री स्की स्पर्धा जिंकली. या क्रीडा प्रकारात Winter Olympics मध्ये तिने पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकले आहे. महिलांच्या ७.५ किलोमिटर प्लास ७.५ किलोमिटर स्कायथलॉनमध्ये अव्वल क्रमांक पटकावत तिने सुवर्ण पदाला गवसणी घातली.
कॅरोलेटने नॉर्वेच्या मारित जोर्गेनला ७.८ सेंकदांनी मागे टाकले. त्यामुळे जोर्गेनला सुदऱ्या क्रमांकावर राहात ब्रॅन्झ पदकावर समाधान मानावे लागले. तर, फिनलॅंडची क्रिस्टा पारमाकोस्कीने कास्य पदक जिंकले.