टीम इंडियाचा ऋषभ पंतवर 'भरोसा' नाही का?, राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं!

कोच राहुल द्रविड पंतवर नाराज?, स्वत: केला खुलासा! 

Updated: Nov 7, 2022, 05:44 PM IST
टीम इंडियाचा ऋषभ पंतवर 'भरोसा' नाही का?, राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं! title=

T20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्ड कपमधील सुपर 4 संघ ठरले असून आता भारताचा सामना इंग्लंडसोबत आहे. भारताने सुपर 12 मधील शेवटच्या झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यामध्ये संघामध्ये काही बदल केले होते. यामध्ये दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. मात्र पंत या सामन्यामध्ये मोठी खेळू शकल नव्हता. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे पंतवर विश्वास राहिला नाही का असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. यावर राहुल द्रविडने आपली प्रतिक्रिया दिली आहे. (T-20 World Cup 2022 ind vs Eng Rahul Dravid on Rishabh Pant sport marathi news)

आमचा पंतवर विश्वास उडाला आहे असं नाही, आम्हाला संघातील सर्व 15 खेळाडूंवर विश्वास आहे. मात्र सामन्यामध्ये 11 खेळाडू खेळू शकतात. संघातील प्रत्येक खेळाडूवर आमचा विश्वास असून तेही केव्हाही खेळण्यासाठी तयार आहेत, असं राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. 

ऋषभ पंत नेटमध्ये भरपूर फलंदाजी आणि कीपिंगचा सराव करत असतो. तो स्वत: ला खेळण्यासाठी तयार ठेवतो. पंत जरी 4 धावांवर बाद झाला तरी त्याच्या खेळण्याचा अॅप्रोच चांगला होता. तसं पाहायला गेलं तर लेफ्ट आर्म स्पिनरविरोधात आक्रमक पवित्रा घेणं हाच त्याचा रोल असल्याचं राहुल द्रविड म्हणाला. 

ऋषभ पंतला इंग्लंडविरूद्धच्या सामन्यामध्ये संधी मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंग्लंडविरूद्धच्या 10 तारखेच्या सामन्यामध्ये ऋषभला संधी देण्यात यावी अशी मागणी क्रीडा प्रेमींनी केली आहे.