Team India : टीम इंडियामध्ये 2 गट? फोटो व्हायरल

टीम इंडियात (Team India) 2 गट पडल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

Updated: Oct 13, 2022, 10:20 PM IST
Team India : टीम इंडियामध्ये 2 गट? फोटो व्हायरल title=

मुंबई :  टीम इंडिया (Team India) टी 20 वर्ल्ड कप 2022 साठी  (T 20 World Cup 2022) अवघ्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला पोहचली. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2022 आधी ऑस्ट्रेलियामध्ये जोरदार सराव करत आहे. मात्र यादरम्यान एक फोटो समोर आला आहे. या फोटोवरुन टीम इंडियातही ठाकरे गट आणि शिंदे गटाप्रमाणे 2 गट पडलेत असं म्हटलं जातंय. (t 20 world cup 2022 team india virat kohli share photo with fellow players memes viral on social media)

टीम इंडियात विराट आणि रोहित असे 2 गट पडल्याचे मीम्स शेअर केले गेले आहेत. यामध्ये  विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत दिसत आहेत. यामध्ये आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि इतर सहकारी आहेत. या खेळाडूंचे 2 स्वतंत्र फोटो विराट गट आणि रोहित गट असं नाव देत हे मीम शेअर केलं गेलंय. 

टीम इंडियाचे खेळाडू वर्ल्ड कपआधी फिरायला गेले होते. या दरम्यानचे फोटो विराटने सोशल मीडियावर शेअर केले. मात्र नेटकऱ्यांनी आपली क्रीएटीव्हीटी दाखवत एकसेएक भन्नाट मीम्स शेअर केले आहेत.