PAK vs BAN : लाहोरच्या मैदानात 'बाबर बाबर'च्या घोषणा, तस्कीनने सेकंदात केली पाकड्यांची बोलती बंद; पाहा Video

Pakistan vs Bangladesh, Asia Cup 2023 : लाहोरमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यात तस्कीन अहमदने बाबर आझमला क्लिन बोल्ड (Clean bold) केलं. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या व्हायरल होतोय.

Updated: Sep 6, 2023, 08:57 PM IST
PAK vs BAN : लाहोरच्या मैदानात 'बाबर बाबर'च्या घोषणा, तस्कीनने सेकंदात केली पाकड्यांची बोलती बंद; पाहा Video  title=
Taskin Ahmed, babar azam

Babar Azam Clean bold Video : आशिया कपच्या (Asia Cup) सुपर 4 मधील पहिला सामना पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये (Pakistan vs Bangladesh) खेळवला जात आहे. लाहोरच्या मैदानात हा सामना खेळवला जात असल्याने पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सामना सुरू झाला अन् पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या (Babar Azam) घोषणा सुरू झाल्या. बाबर फलंदाजीला आला अन् पाकिस्तानच्या आनंद गगनात मावेना झाला. मात्र, बांग्लादेशच्या तस्कीन अहमदने (Taskin Ahmed) पाकिस्तानच्या आनंदावर पाणी फेरलंय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

नेमही सलामीला येणारा बाबर आझम यावेळी सलामी देण्यासाठी मैदानात उतरला नाही. फकर झमान आणि इमाम उल हक यांनी ओपनिंग केली. मात्र, फकर झमान 20 धावा करत बाद झाल्यानंतर वन डाऊनला बाबर मैदानात आला. बाबरला पाहताच पाकिस्तानी फॅन्सने बाबर बाबरच्या घोषणा दिल्या. मात्र, बाबरला जास्त काळ हा उत्साह टिकवला आला नाही. सामन्याच्या सोळाव्या ओव्हरला शाकिब अल हसनने तस्कीन अहमदला बॉलिंग दिली. त्यावेळी ओव्हच्या तिसऱ्या बॉलवर तस्कीनने बाबरच्या दांड्या उडवल्या. परफेक्ट इनस्विंग बॉलवर तस्कीनने बाबरचा टप्प्यात कार्यक्रम केला.

बाबर आझमला फक्त 17 धावा करता आल्या. त्याने 22 बॉलचा सामना केला. त्यात त्याला फक्त 1 फोर मारता आला. बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना 193 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला 194 धावांचं सोप्पं लक्ष मिळालंय. 

पाहा Video

पाकिस्तानची नाचक्की

पाकिस्तानचा खेळ सुरु असताना 5 व्या षटकात सामना थांबवावा लागला होता. स्टेडियममधील फ्लड लाईट खराब झाल्याने हा सामना थांबवावा लागला. तब्बल 22  मिनिटं सामना थांबवल्याने जगभर पाकिस्तानची नाचक्की होताना दिसत आहे. आशिया कपसारख्या महत्त्वाच्या सामन्यात असा प्रकार घडल्याने पाकिस्तानच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

बांगलादेश : शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, लिटॉन दास, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद.

पाकिस्तान : बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी आणइि हरीस रौफ.