IND vs SL: भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला वनडे सामना खेळवण्यात आला होता. हा सामना अनिर्णित राहिला. टीम इंडिया 230 रन्सवर ऑल आऊट झाल्याने कोणत्याही टीमला विजयी घोषित करण्यात आलेलं नाही. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी खेळी करत अर्धशतक झळकावलं. वनडे सिरीजमधील एक सामना झाला असून अजून 2 सामने बाकी आहेत.
पथुम निशांक आणि दुनिथ वेललागे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या वनडे सामन्यात भारतासमोर 231 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेलालगेच्या 65 बॉल्समध्ये नाबाद 66 रन्स आणि निशांकाच्या 56 रन्सच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 50 ओव्हर्समध्ये आठ विकेट्स गमावून 230 रन्स केले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि 101 धावांवर पाच विकेट गमावल्या. मात्र, प्रथम निशांक आणि नंतर वेलालगे यांनी शानदार अर्धशतकं झळकावत चांगला खेळ केला. यावेळी त्यांनी भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले. भारताकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कॅप्टन्स इनिंग खेळली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 230 रन्स केले. याला प्रत्युत्तर देताना भारताने चांगली सुरुवात केली. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मा चांगलाच आक्रामक दिसून आला. यावेळी अवघ्या 33 बॉल्समध्ये रोहितने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र रोहित व्यतिरीक्त कोणत्याही फलंदाजाला साजेसा खेळ करता आला नाही. अखेरीस रोहित शर्माच्या अर्धशतकावर पाणी फेरलं गेलं.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
श्रीलंका- पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालागे, अकिला धनंजय, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.