होबार्ट : ऑस्ट्रेलियातली टी-२० लीग असलेल्या बिग बॅश लीगमध्ये ग्लेन मॅक्सवेलचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. बिग बॅश लीग २०१८-१९मध्ये होबार्ट हरीकेन्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यामध्ये खेळवण्यात आलेल्या मॅचमध्ये प्रेक्षकांना मेलबर्नचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलची तुफानी बॅटिंग पाहायला मिळाली. मॅक्सवेलनं जोरदार फटकेबाजी करत ५ शानदार सिक्स मारले. यातले लागोपाठ २ बॉलला मारलेले सिक्स स्पेशल होते. मॅक्सवेलनं या दोन बॉलवर दोन वेगवेगळ्या स्टाईलनं सिक्स मारले, पण या दोन्ही सिक्स एकाच ठिकाणी मारले गेले.
मॅक्सवेलनं पहिली सिक्स मारताना रिव्हर्स स्वीप मारली. तर दुसरी सिक्स कव्हर वरून मारली. या दोन्ही सिक्स डीप कव्हरच्या वरून गेल्या. एवढच नाही तर दोन्हीवेळा बॉल हरवल्यामुळे अंपायरना नवीन बॉल मागवावा लागला.
A couple of balls lost in consecutive deliveries. In the same spot. With two wildly different shots.
Yes, Glenn!#BBL08 | @Weet_Bix pic.twitter.com/8LsRwWlYFe
— KFC Big Bash League (@BBL) December 24, 2018
मॅक्लवेलनं इनिंगच्या १३व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला स्टान्स बदलून रिव्हर्स स्वीप मारत बॉल मैदानाबाहेर पाठवला. यानंतरच्या पुढच्या बॉलला मॅक्सवेलनं ऑफ साईडवरून बॉल टोलवला. मॅक्सवेलनं या मॅचमध्ये २७ बॉलमध्ये ४७ रनची खेळी केली. यामध्ये ५ सिक्सचा समावेश होता. तर मॅक्सवेलला या खेळीमध्ये एकही फोर मारता आली नाही.
मॅक्लवेलच्या या खेळीमुळे मेलबर्न स्टार्सनं २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून १५५ रन केले. मॅक्सवेलबरोबरच मेलबर्नच्या निक लारकिननं ४५ रन आणि मार्कस स्टॉयनीसनं २२ रनची खेळी केली. होबार्ट हरीकेन्सच्या जोफ्रा आर्चरनं ३ आणि डार्सी शॉर्टनं २ विकेट घेतले.