विराटने ईशांतला लाथ मारत सांगितली गुड न्यूज, कोहलीच्या वागण्यामागचं काय कारण?

 ईशांत शर्माला काय दिली गुडन्यूज? कोहलीनं सांगितला किस्सा

Updated: May 23, 2021, 03:56 PM IST
विराटने ईशांतला लाथ मारत सांगितली गुड न्यूज, कोहलीच्या वागण्यामागचं काय कारण? title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात इशांत शर्माने आपला शंभरावा कसोटी सामना खेळला होता. त्यानिमित्ताने विराट कोहलीनं एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. टीम इंडियाचे खेळाडू जसे मैदानात मजा करत असतात तसेच मैदानाबाहेर देखील अनेक गमती-जमती करत असतात. 

'कोहली आणि ईशांत शर्मा बऱ्यापैकी सामने एकत्र खेळले आहेत. दरम्यान विराट कोहलीला एक गुडन्यूज सांगायची होती. त्यावेळी ईशांत शर्मा थकून आपल्या खोलीमध्ये झोपला होता. त्याला उठवायचं कसं? तर विराट कोहलीनं उत्साहाच्या भरात त्याला किक मारली आणि त्यानंतर गुडन्यूज सांगितली.' 

'ईशांतचा दोन मिनिटांसाठी या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. ईशांत शर्माचं टीम इंडियामध्ये सिलेक्शन झालं होतं आणि स्वत: विराट कोहली हे सांगायला आला होता. ईशांतला वाटलं की विराट त्याची मस्करी करत आहे. पण विराटने हे खरं असल्याचं सांगितलं.'

'विराटने इशांत शर्माचा संपूर्ण 100 कसोटी सामन्यांचा प्रवास पाहिला आहे. आम्ही दोघांनी आमची कामगिरी खूप चांगल्या पद्धतीनं करत आहेत. इशांतच्या गोलंदाजीचा आनंद घेण्यासाठी मिळतो आणि याचा आनंद आहे की त्याच्यासोबत या संपूर्ण प्रवासत मी देखील आहे.' अशी भावना विराट कोहलीनं एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केली होती.