मुंबई : टीम इंडिया विरूद्ध इंग्लंडमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवसाची सुरुवातचं दोन दिग्गज खेळाडूंच्या वादाने झाली. विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो या दोन्ही खेळाडूंमध्ये स्लेजिंग पाहायला मिळाली. ही स्लेजिंग इतक्या टोकाला पोहोचली की नंतर अंपायर्सना हस्तक्षेप करावा लागला.या वादाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
इंग्लंडच्य़ा पहिल्या डावाची सुरुवात काहीशी चांगली झाली नाहीये. तर इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोने डाव सावरला आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टोमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात वाद झाला.
जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत असताना स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहली काहीतरी म्हणाला. यावर जॉनी बेअरस्टोने प्रत्युत्तर देण्यासाठी तो थेट विराटच्या दिशेने सरसावला. यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दीक बाचाबाची झाली. या वादात विराट जॉनी बेअरस्टोला, मला काय करायचं ते सांगू नकोस, तोंड बंद करून बॅटींग कर असा सल्ला देतानाचे शब्द स्टम्पच्या माईकमध्ये ऐकू आले.
<
It's tense out there between Virat Kohli and Jonny Bairstow #ENGvIND pic.twitter.com/3lIZjERvDW
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 3, 2022
दरम्यान या दोघांमधला वाद इतका वाढला की पंचांनाही हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पंचांनी कोहली आणि बेअरस्टो यांना शांतता राखण्यास सांगितले. त्यानंतर वातावरण थोडे शांत झाले. त्यानंतर मोहम्मद शमीची ओव्हर संपली आणि ब्रेकच्या दरम्यान पुन्हा विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात चर्चा झाली.
टीम इंडिया मजबूत स्थितीत
एजबॅस्टन कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 416 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून ऋषभ पंतने 146 आणि रवींद्र जडेजाने 104 धावा केल्या. टीम इंडियाने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. 83 धावांवर इंग्लंडच्या पाच विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेत भारत आधीच 2-1 ने आघाडीवर आहे, जर टीम इंडियाने हा सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तर मालिका भारताच्या नावावर होईल.