नवी दिल्ली : टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि कॅप्टन विराट कोहलीही यशाचं शिखर गाठत असल्याचं पहायला मिळत आहे.
श्रीलंका दौऱ्यात क्लिन स्विपनंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ४-१ने पराभव केला. न्यूझीलंडसोबत झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीने आपली २००वी सेंच्युरी खेळली. या मॅचमध्ये विराट कोहलीने जबरदस्त सेंच्युरी करत आपल्या नावावर नवा रेकॉर्ड नोंद केला.
क्रिकेटच्या सर्वच फॉर्मेटमध्ये विराट कोहली जबरदस्त बॅटिंग करत आहे. कॅप्टनपदाची धूरा सांभाळल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही सुधारली आहे. क्रिकेटच्या विश्वात विराटचं नाव सर्वश्रेष्ठ बॅट्समन म्हणून घेतलं जातं. असं म्हटलं जातं की, सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड्स तोडण्याची क्षमताही कॅप्टन विराट कोहलीमध्ये आहे.
आपल्या चांगल्या पर्सनॅलिटीसोबतच चांगला खेळ दाखवणाऱ्या विराट कोहलीचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. आपल्या कामगिरीच्या जोरावर विराट रेकॉर्ड्स तोडत आहे. याच दरम्यान खेळात कमाई करण्याच्या बाबतीत विराटने स्टार फुटबॉलर लियोनल मेसीलाही मागे टाकलं आहे.
फोर्ब्सने जगभरातील प्रसिद्ध प्लेयर्सची यादी त्यांच्या कमाईनुसार तयार केली आहे. या यादीत अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर मेसी याला मागे टाकत विराटने फोर्ब्सच्या यादीत सातवं स्थान मिळवलं आहे. तर, मेसीला नववं स्थान मिळालं आहे.
या यादीत स्वित्झर्लंडचा रॉजर फेडररने अव्वल क्रमांक गाठला आहे. त्याची कमाई ३७२ मिलियन डॉलर आहे. जमैकाचा अॅथलेटीक उसेन बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे तर फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
१) रॉजर फेडरर (३७.२ मिलियन डॉलर)
२) लेब्रोन जेम्स (३३.४ मिलियन डॉलर)
३) उसेन बोल्ट (२७ मिलियन डॉलर)
४) क्रिस्टियानो रोनाल्डो (२१.५ मिलियन डॉलर)
५) फिल मिकेलसन (१९.६ मिलियन डॉलर)
६) टायगर वूड्स (१६ मिलियन डॉलर)
७) विराट कोहली (१४.५ मिलियन डॉलर)
८) रॉकी मॅकलेरॉय (१३.६ मिलियन डॉलर)
९) लियोनेल मेसी (१३.५ मिलियन डॉलर)
१०) स्टीफन करी (१३.४ मिलियन डॉलर)