क्रिकेटचा किंग विराट कोहली जेव्हा मैदानात फूटबॉल खेळताना दिसतो...व्हिडीओ

विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो क्रिकेटऐवजी फुटबॉल खेळताना आहे. 

Updated: May 26, 2021, 02:07 PM IST
क्रिकेटचा किंग विराट कोहली जेव्हा मैदानात फूटबॉल खेळताना दिसतो...व्हिडीओ

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार आपल्या उत्तम फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्याने फलंदाजीमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तयारी सुरू केली आहे. हा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड 18 जून 2021 रोजी साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे.

विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो क्रिकेटऐवजी फुटबॉल खेळताना आहे. विराट गोल करण्यासाठी कीक मारतो मात्र त्याचा गोल हुकतो. कीक मारल्यानंतर चेंडू गोल पोस्टच्या वरच्या बाजूस गेला. गोल हुकल्यामुळे विराट कोहलीला खूप वाईट वाटलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराट कोहलीने केलेल्या या प्रयत्नावर एफसीगोवा आणि कुलदीप यादवने कमेंट केली आहे. विराट कोहली इंडियन सुपर लीग टीमच्या एफसी गोवाचे को ओनर आहे. कोहलीची यामध्ये 12 टक्के भागीदारी आहे. कोहलीने केलेल्या प्रयत्नावर FC Goaने देखील कमेंट केली आहे.