Video 19 Year New Commer Reverse Scoops Jasprit Bumrah For Six: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आजपासून सुरु झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून हा दिवस गाजवला तो ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा सॅम कोस्टास आणि जसप्रीत बुमराहने! ऑस्ट्रेलियाकडून सर्वात कमी वयात पादर्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 19 वर्ष 85 दिवसांच्या वयासहीत चौथ्या स्थानी झेप घेत सॅम कोस्टासने आज पहिल्यांदा अंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं. आपल्या दमदार आणि स्फोटक खेळूने या नवख्या खेळाडूने सर्वांचीच मनं जिंकली.
अनुभवी उस्मान ख्वाजासोबत सलामीला आलेल्या 19 वर्षीय सॅम कोस्टासने 19 ओव्हरमध्येच संघाला 89 धावांपर्यत मजल मारण्यात मोलाचा हातभार लावला. 89 पैकी 60 धावा करत सॅम कोस्टासने अगदी चौकार, षटकरांचा पाऊस पाडला. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करणाऱ्या सॅम कोस्टासने बेधडकपणे फटकेबाजी केली. या फटकेबाजीला प्रसाद भारताचा अव्वल गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहलाही मिळाला. पहिलाच सामना खेळताना सॅम कोस्टास तणावत आहे असं कुठेही जाणवलं नाही. त्याने सामन्यातील 7 व्या ओव्हरला बुमरहाच्या गोलंदाजीवर 14 धावा कुटल्या. तर 11 व्या ओव्हरमध्ये 18 धावा केल्या.
ज्या बुमराहच्या गोलंदाजीसमोर फलंदाज उभं राहण्यासही घाबरतात त्याला रिव्हर्स स्कूपचा फटका मारण्याचा प्रयत्न सॅम कोस्टासने केला. मात्र दोनदा प्रयत्न करुनही त्याला अपयश आलं तरी त्याने केलेल्या प्रयत्नाचं क्रिकेट चाहत्यांनी कौतुक केलं. काही प्रयत्न फसले असले तरी कर्णधार रोहित शर्मा थर्ड मॅनला खेळाडू उभा करण्याआधी सॅम कोस्टासने यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या डोक्यावरुन स्कूप शॉट खेळला. हा चौकार मिळवल्यानंतर सॅम कोस्टासने पुन्हा एकदा रिव्हर्स स्कूपचा फटका मारत थेट षटकार लगावला.
1)
A bit of audacity!
Smiles everywhere as the 19-year-old Sam Konstas attempted to ramp Jasprit Bumrah very early in his debut #AUSvIND pic.twitter.com/9I9urUnmuq
— cricket.com.au (@cricketcomau) December 25, 2024
सॅम कोस्टासने बुमराहच्या एका ओव्हरमध्ये 18 धावा केल्या. बुमराहला कसोटी क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये लगावण्यात आलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा ठरल्या. सामन्यातील 11 व्या ओव्हरमध्ये सॅम कोस्टासने ही कमाल करुन दाखवली. बुमराहची धुलाई होत असल्याचं पाहून रोहित शर्माने गोलंदाज बदलून अकाश दीपकडे चेंडू सोपवला. सॅम कोस्टासने बुमराहला लगावलेल्या या चौकार, षटकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.
WHAT ARE WE SEEING!
Sam Konstas just whipped Jasprit Bumrah for six #AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/ZuNdtCncLO
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2024
बुमराहने 21 ओव्हरपैकी 7 निर्धाव ओव्हर टाकल्या. 75 धावांच्या मोबदल्यात बुमराहला 3 विकेट्स घेता आल्या.