कोलकाता : वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने अवघ्या 8 रन्सने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात टीमची ढिसाळ फिल्डींग पहायला मिळाली. यावेळी रोहित शर्माला राग अनावर झाला आणि त्याने भर मैदानात बॉलला लाथ मारली. यावरून रोहित शर्मावर टिकाही करण्यात आली. दरम्यान सामन्यानंतर त्याने बॉलला लाथ मारण्यावर प्रश्नही विचारण्यात आला.
सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी दरम्यान हर्षा भोगले यांनी रोहितला मस्करीत हा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताच रोहित शर्मा हसू लागला.
रोहित शर्मा म्हणाला, फिल्डींगमध्ये मला कमतरता दिसून आली. यापुढे झालेल्या चुका सुधारण्यावर आम्ही प्रयत्न करू. कारण आमची गणना चांगल्या फिल्डींग साईडमध्ये केली जाते.
वेस्टइंडिज खेळत असताना 16व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता. त्यावेळी वेस्ट इंडिजचा रॉवमॅन पावेलने एका मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल जास्त दूर न जाता पिचजवळच राहिला. यावेळी भुवनेश्वरने तो कॅच घ्यायला हवा होता. मात्र तसं झालं नाही.
एक उंच मात्र सोपा कॅच भुवनेश्वरने सोडून दिला. मुख्य म्हणजे त्यावेळी बाजूलाच कर्णधार रोहित शर्मा कॅच घेण्यासाठी उभा होता. मात्र भुवनेश्वने तो कॅच सोडला त्यावेळी रोहितची रिएक्शन पाहण्यासारखी होती. यावेळी रागाच्या भरात रोहितने बॉलला जोरदार लाथ मारली.