WI vs IND : टीम इंडिया ( Team India ) सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. 12 तारखेपासून टीम इंडियाला वेस्ट इंडिज ( west Indies ) विरूद्ध पहिली टेस्ट मॅच खेळायचं आहे. 2 सामन्यांची ही टेस्ट सिरीज असून भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरु होणार आहे. या सिरीजसाठी बीसीसीआयने ( BCCI ) टीम इंडियाची घोषणा केली असून पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे पहावं लागणार आहे.
वेस्ट इंडिजविरूद्ध पहिल्या सामन्यात ( WI vs IND 1st Test ) कोण ओपनिंग करणार हा प्रश्न आहे. यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंग करत होते. मात्र या सामन्यात कदाचित ही जोडी बदलू शकते. पहिल्या टेस्टमध्ये शुभमन गिलच्या जागी यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जयस्वालने प्रॅक्टिस सामन्यात चांगला खेळ केल्याने त्याच्या नावाच विचार केला जाऊ शकतो.
वेस्ट इंडिज आणि भारत ( WI vs IND 1st Test ) यांच्यातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या मधल्या फळीत आतापर्यंत चेतेश्वर पुजारा येथे तिसऱ्या क्रमांकावर दिसत होता. पण यावेळी शुभमन गिल पुजाराची जागा घेऊ शकतो. नंबर 4 वर विराट कोहली उतरणार असून पाचव्या नंबरवर उप कर्णधार अजिंक्य रहाणेला संधी मिळणार आहे.
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्या पहिल्या टेस्ट सामन्यात ( WI vs IND 1st Test ) टीम इंडियाच्या विकेटकीपिंगबाबत बरीच चर्चा सुरु आहे. काहींना केएस भरतला संधी मिळावी असं वाटतंय तर काहीजण ईशान किशनला संधी मिळावी असं म्हणतायत. यामध्ये इशानला टेस्ट डेब्यूची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.
या सामन्यात (WI vs IND 1st Test) टीम इंडियाच्या 3 ऑल राऊंडर्सना संधी मिळण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजाला सातव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली तर आठव्या क्रमांकावर रविचंद्रन अश्विन तर तिसरा शार्दुल ठाकूर असू शकतो.
वेस्ट इंडिज आणि भारत ( WI vs IND 1st Test ) च्या पहिल्या टेस्ट सामन्यातील टीम इंडियाचे दोन मुख्य वेगवान गोलंदाज असू शकतात. हे खेळाडू म्हणजे मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी. सैनी जवळपास 2 वर्षांनंतर टीम इंडियामध्ये परतलाय.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी