मुंबई : भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिने २०१९च्या आयएसएसएफ विश्वचष स्पर्धेत सुवर्ण यशाला गवसणी घातली आहे. भारताच्या वतीने या स्पर्धेत सहभागी झालेल्या मनूने देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. दहा मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत तिने हे यश संपादन केलं.
मनूने एकूण २४४.७ इतक्या गुणांसह कनिष्ठ गटातील विश्वविक्रम मोडीत काढला. शिवाय हीना सिद्धू हिच्यानंतर दहा मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी मनू ही दुसऱी भारतीय खेळाडू ठरली आहे.
Shooter Manu Bhaker has won gold in Women's 10m Air Pistol with a new junior world record score of 244.7 at ISSF World Cup Final. (file pic) pic.twitter.com/y0qbsoAzzG
— ANI (@ANI) November 21, 2019
GOLD! A brilliant @realmanubhaker demolishes a top class field to win her first @ISSF_Shooting World Cup final in the Women’s 10m Air Pistol! And in junior world record score of 244.7 as well!!! Awesome! @RaninderSingh @WeAreTeamIndia @Media_SAI @KirenRijiju pic.twitter.com/kVK2kOuJDU
— NRAI (@OfficialNRAI) November 21, 2019
भारताच्याच यशस्वीनी देस्वाल हिनेसुद्धा या स्पर्धेच सहभाग घेतला होता. तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत सर्बियाच्या झोराना अरुनोविक हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तिने २४१.९ गुणांची कमाई केली. तर, चीनच्या स्पर्धकाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. दरम्यान, पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत ५८८ गुणांसह अभिषेक वर्मा आणि ५८१ गुणांसह सौरभ चौधरी हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते.