राहुल बोले, सरकार चाले- अण्णा
कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांना लोकपालच्या कक्षेतून वगळल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप लावला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय हा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्यामुळेच पंतप्रधानांनी घेतल्याचाही आरोप अण्णांनी यावेळी केला.
Dec 2, 2011, 01:54 PM ISTलोकपालच्या बाहेर 'क्लास' थ्री
लोकपाल बिलच्या ड्राफ्टमधून अखेर क्लास थ्री कर्मचा-यांना बाहेर ठेवण्याचाच निर्णय संसदेच्या स्थायी समितीने घेतलाय. तर लोकपालच्या कक्षेत सर्व कर्मचारी आणि पंतप्रधान यायला हवेत, असं पुण्यात अण्णा हजारेंनी स्पष्ट केलय.
Dec 2, 2011, 11:49 AM ISTराणेंचा अण्णांवर 'प्रहार'
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी थेट अण्णा हजारे यांना लक्ष बनवत हल्लाबोल केला आहे. राणेंच्या 'प्रहारा'वर अण्णा काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
Dec 2, 2011, 08:48 AM ISTसरकारची नियत साफ नाही – अण्णा हजारे
सरकारची जनलोकपालबाबत नियत साफ नाही असा घणाघाती आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केला. राळेगणसिद्धी इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सरकार जनलोकपालबाबत चालढकल करत आहे. सिटीझन चार्टरसाठी वेगळ्या कायद्याची गरज काय असा सवालही अण्णांनी केला.
Nov 30, 2011, 01:16 PM ISTअण्णा टाईम ‘टाईम’ की बात है
ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे जनलोकापाल विधेयकासाठी केलेल्या उपोषणामुळे जगभरात पोहचले. आता लवकरच अण्णा हजारे प्रतिष्ठेच्या टाईम मासिकाच्या कव्हरवर हजेरी लावतील असं त्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितलं.
Nov 28, 2011, 09:16 AM ISTजंतरमंतरवर अण्णा धरणार धरणं
हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल बिल पास न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याची तयारी अण्णा हजारे यांनी सुरू केली, पण त्याआधी जनलोकपाल संमत करण्याआधी आपणा भारतीयांची एकजूट किती आहे हे दाखविण्यासाठी अण्णा पुन्हा एकदा जंतरमंतरवर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहेत.
Nov 28, 2011, 08:22 AM ISTअण्णा फॅसिस्ट - डॉ. भालचंद्र मुणगेकर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मी म्हणेल तोच कायदा ही भूमिका अयोग्य असल्याचं मत खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी व्यक्त केलं आहे.
Nov 27, 2011, 06:28 AM ISTअण्णांच्या मुद्दांवर अधिक भाष्य करण्यास पवारांचा नकार
शरद पवार हल्ल्यानंतर मुंबईत परतले. अण्णांच्या मुद्दावर अधिक भाष्य करण्यास पवारांनी नकार दिला.
Nov 25, 2011, 06:25 PM ISTराळेगणमध्ये राडा
अण्णांच्या वक्तव्यावरून राळेगणमध्ये आज राडा झाला. राळेगणमध्ये अण्णा समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. राष्ट्रवादीच्या आंदोलनाने गावकरी चिडले आणि गावात घुसणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावलं.
Nov 25, 2011, 04:26 PM ISTमुंबईत अण्णांच्या पुतळ्याचं दहन
दादरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या पुतळ्याचं दहन केलं. शरद पवारांवरच्या हल्ल्याचा कालपासूनच राज्यभरात निषेध केला जातोय.
Nov 25, 2011, 09:06 AM ISTअण्णांचा नव्याने ब्लॉग सुरू
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पहिला ब्लॉग दोन आठवड्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. आता अण्णांनी नव्याने ब्लॉग सुरू केला आहे. त्याचा पत्ता मात्र बदलला आहे.
Nov 24, 2011, 03:21 AM ISTपंतप्रधानांचं अण्णांना लोकपाल लेटर
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर होईल, असं पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना पाठवलय.
Nov 23, 2011, 07:29 AM ISTअण्णा मेणाचे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आलाय
Nov 20, 2011, 12:36 PM ISTक्लास वन, टू लोकपालाच्या कक्षेत
फक्त क्लास वन आणि क्लास टू याच सरकारी अधिका-यांना लोकपालच्या कक्षेत आणलं जाण्याची शक्यता आहे.
Nov 15, 2011, 06:43 AM ISTकोअर कमिटीत सर्वधर्मीय व्यक्ती –अण्णा
टीम अण्णांच्या कोअर कमिटीत सर्वधर्मीय आणि चारित्र्यवान व्यक्तींचाच समावेश करण्यात येईल, त्या संदर्भात निरीक्षक आणि या संदर्भातील व्यक्तींकडून अशा व्यक्तींची निवड करण्यात येईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
Nov 14, 2011, 08:25 AM IST