राष्ट्रवादीचे भुजबळ, घोटाळेबाज कलमाडी अडचणीत
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नाशिकचे लोकसभा उमेदवार छगन भुजबळ अडचणीत आलेत. तर सुरेश कलमाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
Mar 1, 2014, 09:37 AM ISTऊर्जा खात्यातील घोटाळा, आरोप अजित पवारांनी फेटाळले
ऊर्जा खात्यातील २२ हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप ऊर्जामंत्री अजित पवारांनी फेटाळून लावले आहेत.
Feb 21, 2014, 01:20 PM ISTरोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं भयान वास्तव
राज्यातील रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं वास्तव भयान आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या योजनेचं राज्यात तीनतेरा वाजलेत. कामं करूनही मजुरांना घामाचे पैसेच मिळाले नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. तर मजुरीचे पैसे न मिळाल्यानं काहींनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. ठेकेदारांची मनमानी मजुरांच्या जीवावर उठली आहे. यावरचा हा विशेष रिपोर्ट
Jan 8, 2014, 05:09 PM ISTसरकारनं `आदर्श`चा अहवाल अंशतः स्वीकारला
कॅबिनेटने आदर्श अहवालाच्या शिफारशी अंशतः स्विकारल्या आहेत. यात १३ मुद्द्यांपैकी काही मुद्दे स्वीकारले आहेत. आदर्श प्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांवर फौजदारी कारवाई होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
Jan 2, 2014, 05:54 PM IST‘आदर्श’ अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा
आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या चौकशी अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या चर्चा होणार आहे. या बैठकीत गेल्या वेळी झालेल्या चर्चेतले मुद्दे संमत करण्यात येणार आहेत.
Jan 1, 2014, 09:15 PM ISTसुरेशदादांनंतर गुलाबराव देवकरांचीही तुरुंगात रवानगी
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी परिवहन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर पोलिसांना शरण आले आहेत.
Dec 31, 2013, 01:05 PM ISTमिलिंद देवरांनी केली मुख्यमंत्र्यांची कोंडी
आदर्श घोटाळा प्रकरणात राज्य सरकारची आणखी नाचक्की झालीय. मिलिंद देवरांनी याप्रकरणी नवा बॉम्बगोळा टाकत मुख्यमंत्र्यांना अधिक गोत्यात आणलंय. आदर्श प्रकरणी विधानसभेत चर्चा व्हायला हवी तसेच दोषींवर कारवाई व्हायला हवी, असं थेट वक्तव्य देवरा यांनी केलंय.
Dec 29, 2013, 07:46 PM ISTबँक घोटाळा : काँग्रेस आमदाराला १२९.३१ कोटींचा दंड!
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित १४९ कोटीच्या घोटाळयाप्रकरणी सहकार विभागाने कॉंग्रेस आमदार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्यावर १२९ कोटी ३१ लाखांचा दंड लावला आहे.
Nov 28, 2013, 08:37 PM ISTसिन्नरमध्ये टँकर पाणी पुरवठा घोटाळा!
ऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.
Oct 7, 2013, 08:58 PM ISTभिकाऱ्यांची किडनी काढून श्रीमंतांची लूट
पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनीकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. रस्त्यावरच्या गोरगरीब भिका-यांची किडनी काढून ती धनाढ्य व्यक्तींना विकली जातेय, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय.
Oct 1, 2013, 05:57 PM ISTतीन महिन्यांत निर्दोषत्व सिद्ध करणार - कलमाडी
खासदार सुरेश कलमाडी यांनी स्वतःलाच क्लीन चीट दिलीय. कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात गैरव्यवहाराचा आरोप कलमाडी यांच्यावर आहे.
Sep 14, 2013, 10:46 AM ISTविद्यार्थ्यांच्या बेंच खरेदीतही घोटाळा!
सहल घोटाळा, संगणक घोटाळा, कंपास पेटी घोटाळा... पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या घोटाळ्यांची ही मालिका. आता या मालिकेत आणखी एका घोटाळ्याची भर पडलीय. विद्यार्थ्यांसाठीच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय.
Aug 5, 2013, 09:03 PM ISTमुंबई मनपात पैशांना फुटले पाय!
मुंबई महापालिकेत विविध खात्यांच्या फायली गायब होण्याचा प्रकार ताजा असतानाच आता थेट खात्यांमध्ये जमा होणारी रक्कमच गायब होण्याचा अजब प्रकार घडलाय. ही रक्कम थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ४३७ कोटी इतकी असल्यानं ही प्रकरण गंभीर बनलंय...
Jul 13, 2013, 09:24 PM ISTमनपाच्या साडी खरेदीतही घोटाळा!
महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठीच्या साडी खरेदीत गैरव्यवहार झालाय. संबंधित ठेकेदारानं महापालिकेला सुमारे २७ लाखांचा गंडा घातल्याचं लेखापरीक्षण समितीच्या अहवालातून समोर आलंय.
May 29, 2013, 06:18 PM ISTऔरंगाबाद मनपात स्वर्ण रोजगार योजनेत कोट्यवधींचा घोटाळा?
बोगस कर्जप्रकरणं मंजूर करून अपात्र लोकांना कोट्यवधींच्या कर्जाचं वाटप... कर्जप्रकरणाचे 11 वर्षातील माहितीचे रेकॉर्ड महापालिकेतून गायब
May 27, 2013, 06:40 PM IST