जोरदार पाऊस

मुंबई, ठाणेसह नवीमुंबईत जोरदार पाऊस, रेल्वे वाहतूक धीमी

 मुंबई आणि ठाण्यात काल रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावलीय. शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. तसंच रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झालाय.सकाळच्या वेळी कामावर बाहेर पडणा-यांचीही या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडालीय.मात्र या पावसातही लोकलसेवा सुरळीत असली तरी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावरील सेवा 10 ते 20 मिनेट उशिराने सुरु आहे.

Jul 16, 2014, 08:21 AM IST

मुंबईसह उपनगरात मुसळधार, भिंत कोसळून 5 जखमी

शहर आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. नालासोपारा भागात काल रात्री भिंत कोसळली. त्य़ामुळे एकाच कुटुंबातले पाच जण जखमी झाले. 

Jul 11, 2014, 07:56 PM IST

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे उकाळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Jun 11, 2014, 09:22 PM IST

मुंबईत पावसाचे दोन बळी, दोन बेपत्ता

मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मानखुर्द नाला येथे एक तर कांदिवली ठाकुर्ली व्हिलेज येथे एक जणाने प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे.

Jul 12, 2013, 04:57 PM IST

पावसाचा धिंगाणा, लोकल लेट तर काही रद्द

मुसळधार पावसाने मुंबईकरांना सळो की पळो करून सोडलेय. अनेक ठिकणी पाणी साचल्याने मुंबईतील बेस्ट वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेत. त्यामुळे मध्य रेल्वेची स्लो वाहतूक बंद झालेय. तर दादर, हिंदमाता, एलफिस्टन(वेस्ट) , सायन रोड २४, भांडूप (वेस्ट) या भागांत पाणी साचल्याने रस्ता वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

Jul 12, 2013, 03:03 PM IST

मुंबईत पावसाचा ५२ वर्षांचा रेकॉर्ड मोडीत

पहिल्याच पावसानं मुंबईला चक्काजाम करून दणका दिला असला, तरी हाच पाऊस एक गुड न्यूजही घेऊन आलाय. यंदा मुंबई महापालिकेच्या सर्व धरणांची पातळी वेळेपेक्षा आधीच चांगली झालीये. १८ जूनच्या आकडेवारीनुसार गेल्या ४ वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या लवकर मुंबईची सर्व धरणं सर्वाधिक भरलीयत.

Jun 19, 2013, 08:32 PM IST

पावसाचा जोर कमी, मुंबई पूर्वपदावर

मुंबईत सुपरसंडेला धो-धो बरसणा-या पावसाचा जोर आठवड्याच्या सुरुवातीला कमी झालाय. सकाळपासूनच मुंबईत पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात झालीय. जोरदार पाऊस नसल्यानं लोकल सेवा सुरळीत सुरु आहे तर ट्रॅफिकही पूर्वपदावर आलंय.

Jun 17, 2013, 09:31 AM IST

मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी

मराठवाडा सोडला तर राज्यभरात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. पावसानं नागपुरकरांना सळो की पळो करुन सोडलंय. नागपुरात आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरु होता.

Jun 14, 2013, 11:21 PM IST

पावसाने उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये पावसाचा दणका बसल्यामुळे सकाळपासूनच उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. गाड्या ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.

Jun 10, 2013, 10:18 AM IST

ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस, लोकलवर परिणाम

राज्यात रविवारी बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. कोकणमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह बोरीवली, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याणमध्ये पावसाचा जोर दिसून येत आहे. या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून येत आहे.

Jun 10, 2013, 07:53 AM IST

`मरे` विस्कळीत; कल्याण स्टेशनवर गर्दीच गर्दी

कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. त्यातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं रेल्वेचा आणि प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला होता. आता मात्र, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आलीय. रेल्वे वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत आहे.

Sep 4, 2012, 11:04 AM IST