स्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 26, 2017, 06:01 PM ISTलष्कर भरती परीक्षेचा पेपर फुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 03:50 PM ISTठाण्यात जनतेला दंडवत करण्यासाठी जाणार - उद्धव ठाकरे
ठाण्यातल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपण लवकरच ठाण्यात जनतेला दंडवत करण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी यावेळी नगरसेवकांना सांगितलं.
Feb 26, 2017, 08:33 AM ISTठाण्यात नगरसेवकांच्या 5 पती-पत्नींच्या जोड्या
ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अनेक दिग्गजना हार पत्कारावी लागली तर काही नवीन चेहऱ्यांनी ही जिंकून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. तर जिंकणाऱ्यांमध्ये काही पती - पत्नी अश्या जोड्या ही आहेत. ठाण्यात जवळपास ५ अश्या जोड्या आहेत.
Feb 25, 2017, 11:03 AM ISTमतदार याद्यांचा गोंधळ उडणार, याचा निवडणूक आयोगाला अंदाज होता?
आज बहुतेक मतदार केंद्रांवर याद्यांमध्ये नाव न सापडल्यानं मतदारांचा गोंधळ उडाला... पण, हा गोंधळ उडणार याचा निवडणूक आयोगाला अंदाजा होता का? असा प्रश्न निर्माण झालाय.
Feb 21, 2017, 06:17 PM ISTमुंबई मनपा निवडणुकीवर सट्टा, कोणाला मिळणार किती जागा ?
मुंबईत कोणाला मिळणार किती जागा ?
Feb 21, 2017, 06:06 PM ISTबॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी नाही केलं मतदान
मुंबई महापालिकेचं मतदान पार पडतंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक विशेष महत्त्व आहे. अनेक मोठी मंडळी हे मुंबईमध्ये राहतात. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क आज बजावला. अनुष्का शर्मा, रेखा, श्रद्धा कपूर, प्रेम चोपडा यांनी आज मतदान केलं. पण असे अनेक सेलिब्रिटी आहे ज्यांनी मतदान नाही केलं.
Feb 21, 2017, 05:39 PM ISTरत्नागिरीत मतदान रांगेत असताना मतदाराचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक मतदानाला गालबोट लागले आहे. रांगेत मतदानासाठी उभ्या असाणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला.
Feb 21, 2017, 03:01 PM ISTकाम जिंकते का पैसा? - राज ठाकरे
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली, 'काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे'.
Feb 21, 2017, 12:42 PM ISTआधी लगीन मतदानाच म्हणत नवरदेव मतदान केंद्रात
21 फेब्रुवारीला लग्नाचे बरेच मुहूर्त होते. पण बहुतेक सगळ्या नवरदेवांनी लग्नाच्या आधी मतदान केंद्र गाठलं. परळ, ठाणे आणि रत्नागिरीमध्ये आधी लगीन मतदानाचं म्हणत मुंडावळ्या बांधलेले नवरदेव मतदान केंद्रात पोहोचले.
Feb 21, 2017, 12:27 PM ISTनाशकात प्रचंड गोंधळ, मतदार यादीत नाव नसल्याने नागरिक संतप्त
म्हसरुळ गावात मतदार यादीत नाव नसल्याने शेकडो मतदारांचा जमाव जमल्याने गोंधळ उडळाला आहे. याठिकाणी तणाव आहे.
Feb 21, 2017, 12:23 PM ISTराज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुटुंबासह आज दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदानाचं आवाहन करतेवेळी पक्षांना कामं करण्याचं आवाहन करणारे फलकही सगळीकडे लावायला हवेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. सोबतच पैशा जिंकतो की काम असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
Feb 21, 2017, 11:18 AM IST...तर मग शरद पवारांनी कोणाला मतदान केलं ?
मग शरद पवारांनी नेमकं कोणाला मतदान केलं
Feb 21, 2017, 10:43 AM ISTनाशिक, नागपुरात बोगस मतदान ; राज्यात अन्य ठिकाणी गोंधळ
राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसाठी मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्ये बोगस मतदानाच्या घटना घडल्या आहेत.
Feb 21, 2017, 10:10 AM ISTमतदान करा फरक पडतो: आम्हाला पाठवा तुमचा मतदान 'सेल्फी'
आपल्या देशाचं खरं आभूषण असणाऱ्या लोकशाहीचा सण साजरा करण्याची संधी महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. राज्यात आज 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदा आणि 118 पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आज मतदान होतंय. सकाळी साडे सातवाजता या उत्सावाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडे पाच पर्यंत मतदार राजाला आपला हक्क बजावता येणार आहे. पण गेल्या काही दिवसात मतदार राजा या उत्सवाकडे पाठ फिरवतोय.
Feb 21, 2017, 09:50 AM IST