लिलावात अनसोल्ड राहणं जिव्हारी लागलं, 'या' भारतीय खेळाडूने घेतला मोठा निर्णय; क्रिकेट विश्वात खळबळ

Siddarth Kaul Retirement: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंना खरेदीदार मिळाले नाहीत. आता त्यापैकी एक खेळाडूने  अवघ्या ३ दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 29, 2024, 12:39 PM IST
लिलावात अनसोल्ड राहणं जिव्हारी लागलं, 'या' भारतीय खेळाडूने घेतला मोठा निर्णय; क्रिकेट विश्वात खळबळ  title=
Photo credit: Social Media

Siddarth Kaul Retirement: आयपीएल सारखा स्पर्धे अनेक नवीन खेळाडूंचे करियर बनवले. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू अल्पावधीतच स्टार बनले, तर काहींना त्यांची कारकीर्द कधी संपली हेही कळले नाही. असाच काहीसा प्रकार टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलसोबत घडला. एकेकाळी आयपीएलचा प्रसिद्ध गोलंदाज सिद्धार्थ कौल अलीकडेच झालेल्या मेगा लिलावात विकला गेला नाही. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती जाहीर करताना त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये त्याने त्याच्या चढ-उतारांची कथाही सांगितली आहे.

सिद्धार्थ कौलनी लिहली भावनिक पोस्ट 

सिद्धार्थ कौलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'जेव्हा मी पंजाबच्या मैदानात क्रिकेट खेळायचो तेव्हा मला एक स्वप्न पडले. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न. 2018 मध्ये, देवाच्या कृपेने, मला T20I संघात माझी इंडिया कॅप क्रमांक 75 आणि एकदिवसीय संघात 221 क्रमांकाची कॅप मिळाली. आता माझी भारतातील कारकीर्द संपुष्टात आणण्याची आणि निवृत्तीची घोषणा करण्याची वेळ आली आहे. माझ्या कारकिर्दीतील सर्व चढ-उतारांमध्ये मला मिळालेले प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञता शब्दात व्यक्त करू शकत नाही.' 

हे ही वाचा: Photos: यशस्वी जयस्वालचं मुंबईतील 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आलिशान युरोप-इन्स्पायर घर बघितलं का?

आयपीएल संघांचे मानले आभार

त्याने पुढे लिहिले की, 'माझ्यासाठी बनवलेल्या मार्गाबद्दल मला देवाचे आभार मानायचे आहेत. चाहत्यांना त्यांच्या अविरत पाठिंब्याबद्दल आणि माझे आई-वडील आणि कुटुंबीयांनी मला दिलेल्या आत्मविश्वासासाठी, विशेषत: दुखापती आणि चढ-उताराच्या वेळी दिलेल्या सोबतीसाठी आभार मानायचे आहे .ड्रेसिंग रूमच्या आठवणी आणि मैत्रीसाठी माझ्या टीममेट्सचेही आभार. एका लहान मुलाचे भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आणि 2008 वर्षाखालील 19 विश्वचषक जिंकण्याचे आणि 2018 मध्ये माझे T20I आणि ODI जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल BCCI चे आभार. मला आयुष्यभराच्या आठवणी दिल्याबद्दल KKR, DD, RCB आणि SRH IPL फ्रँचायझींचे आभार.' 

हे ही वाचा: Kho Kho World Cup: खेळ सोडण्याचा निर्णय ते प्रशिक्षकाने केलेली मदत.. शेतकरी कुटुंबातील सचिन भार्गो खो-खो विश्वचषक खेळण्यासाठी उत्सुक

 

 

हे ही वाचा: IPL लिलावात नवऱ्याला खरेदी न केल्याने संतापली पत्नी, शाहरुखच्या टीमवर काढला राग!

भविष्यातील प्लॅनबद्दल सिद्धार्थने काय लिहले आहे?

सर्वांचे आभार मानताना कौलने लिहिले, 'शेवटी, @pcacricketassociation ला 2007 मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण करण्याची संधी दिल्याबद्दल आणि माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याशिवाय मी आज आहे जी व्यक्ती आहे ती बनू शकलो नसतो. मला माहित नाही की भविष्यात काय होईल पण मी या धड्याकडे फक्त आनंदी आठवणींसारखे मागे वळून पाहतो आणि आता पुढच्या अध्यायाकडे वाटचाल करतो. पुन्हा एकदा, धन्यवाद.' कौलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 वनडे आणि तितके टी-20 सामने खेळले आहेत. मात्र, त्याने आयपीएलमध्ये दीर्घकाळ योगदान दिले.