दिल्ली गँगरेप : मुख्य आरोपीची जेलमध्ये आत्महत्या
दिल्लीतील गँगरेप प्रकरणातील प्रमुख आरोपी राम सिंह याने आज पहाटे पाच वाजता तिहार कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आज न्यायालापुढे हजर करण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्याने आपले जीवन संपविले.
Mar 11, 2013, 08:52 AM ISTअफझल गुरूला फाशी कायद्यानुसारच- सुशीलकुमार शिंदे
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला अखेर शनिवारी फाशी देण्यात आली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
Feb 11, 2013, 04:44 PM ISTअफजल गुरुच्या फाशीवरुन राजकारण सुरु
अफजल गुरुच्या फाशीवरुन आता राजकारण सुरु झालंय. सुशीलकुमार शिंदेचं भगवा दहशतवादावर पडदा टाकण्यासाठी हा मुहूर्त साधल्याचा आरोप मुरली मनोहर जोशींनी आरोप केलाय. तर अफजलच्या फाशीनंतर देशात एका समाजाचा रोष टाळण्यासाठी शिंदेंचं विधान होतं का असा तर्क लढवला जातोय.
Feb 10, 2013, 11:20 AM IST`फाशीच्या वेळी गुरुच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एकही रेषा नव्हती`
संसद हल्ला प्रकरणातील दोषी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या दहशतवादी अजमल गुरूला शनिवारी सकाळीच फासावर चढवण्यात आलं. पण, यावेळीही त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चातापाचा भाव नव्हता.
Feb 9, 2013, 11:12 PM ISTगुरुचा खेळ खल्लास : द्या तुमच्या प्रतिक्रिया...
आत्ताच का दिली गेली अफजललं फाशी? पहिल्यांदा कसाब आणि आता अफजल गुरु? पाकिस्तानला भारतानं एक मूक संदेश दिलाय का? काय वाटतं तुम्हाला?... मांडा तुमचं रोखठोक मत...
Feb 9, 2013, 03:57 PM ISTफाशीच्या भितीने अफजल झोपलाच नाही
संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरू याला आज जरी फाशी दिली तरी तो रात्रभर झोपलाच नव्हता. तो फाशीच्या भितीने जागाच होता. फाशी देणार असल्याचे कळविल्यानंतर त्याची चुळबूळ सुरू होती. त्याने कुराण वाचले आणि सकाळी तो फाशीला सामोरा गेला.
Feb 9, 2013, 02:53 PM ISTअफजल गुरूच्या फाशीचा आजचा दिवस - गृहमंत्री
संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरू याच्या फाशीची तारीख आधीच ठरली होती. त्यानुसार आजचा दिवस निवडण्यात आला, अशी फाशीची औपचारिक घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.
Feb 9, 2013, 12:54 PM IST‘गुरूला फाशी : बाळासाहेबांची मागणी पूर्ण’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दहा वर्षांपासून गुरूला फाशी देण्याची मागणी करीत होते. गुरू हा सरकारचा जावई आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला होता, त्यांची ही मागणी उशिरा का होईना मान्य झाली. यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
Feb 9, 2013, 12:24 PM ISTअफजल गुरूचे तिहार जेलमध्ये दफन
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला सकाळी फाशी देण्यात आल्यानंतर त्याचे दफन तिहार जेल परिसरात करण्यात आलंय. तिहार जेलमध्ये सकाळी आठ वाजता अफजलला फाशी देण्यात आली होती.
Feb 9, 2013, 10:44 AM ISTअफजल गुरूला केव्हा दिली फाशी
संसदेवरील हल्ल्यातील दोषी प्रमुख आरोपी अफजल गुरु याला आज शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान तिहार कारागृहात फाशी दिले आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
Feb 9, 2013, 08:30 AM ISTसंसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरूला फाशी
दहशतवादी अजमल कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ला फाशी दिल्यानंतर, २००१ मध्ये संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरूला फाशी केव्हा होणार, असा प्रश्नर विचारण्यात येत होता. अफजल गुरूला दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्याच्या फाशीची तयारी करण्यात सकाळी सुरू होती. त्याला फाशी देण्यात आली.
Feb 9, 2013, 07:51 AM ISTकलमाडी-राजा यांनी घेतला खीर, हलव्याचा आस्वाद
कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी आणि 2 G स्पेक्ट्रम प्रकरणी अटकेत असलेले ए.राजा यांनी तिहार जेलमध्ये नवर्षाचे स्वागत खास भोजनाचा आस्वाद घेत केलं. कलमाडी आणि राजा यांच्यासाठी पनीर, खीर, हलवा असा खासा बेत होता.
Jan 1, 2012, 07:11 PM ISTकनिमोळींची तिहार जेलमधून सुटका
टू जी स्पेक्टम घोटाऴ्याप्रकरणी आरोपी असलेल्या खासदार कनिमोळी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. काल त्यांची सुटका करण्यात आली.
Nov 30, 2011, 03:28 AM ISTशाहिद बलवालाही जामिन मंजूर
जी घोटाळ्यात कनिमोळी पाठोपाठ स्वान टेलिकॉमचे प्रमोटर शाहिद बलवा यांनाही कोर्टानं दिलासा दिलाय. प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून तिहार जेलच्या मुक्कामी असणाऱ्या शाहिद बलवांना पटियाला कोर्टानं जामिन मंजूर केलाय.
Nov 29, 2011, 04:56 PM ISTसुधींद्र कुलकर्णींचा वाढला तिहार मुक्काम!
'कॅश फॉर व्होट' प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या सुधींद्र कुलकर्णींचा तिहार जेलमधील मुक्काम वाढला आहे. कुलकर्णींच्या सोबत फग्गनसिंग कुलस्ते, आणि कुलदिपसिंग भगोडाही जेलमध्ये आहेत.
Oct 31, 2011, 06:44 AM IST