रांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा 'तुझ्यात जीव रंगला'
कोल्हापुरी माणूस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबड्या मातीतला रांगडा गडी... रांगडेपणा हा इथल्या मातीचा आणि या मातीतील माणसांचा स्वभावधर्मच... पण, या रांगडेपणालाही प्रेमाची, मायेची एक नाजुकशी झालर असते ज्यामुळेच इथल्या लोकांचा वेगळेपणा नजरेत भरतो. अशाच रांगडेपणातील प्रेमाची एक अलवार गोष्ट बघायला मिळणार आहे 'झी मराठी'च्या आगामी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून... येत्या ३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Sep 27, 2016, 04:59 PM IST