तूर

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तूर खरेदी सुटीतही

सुटीच्या दिवशीही तूर खरेदी होणार आहे. तशी घोषणा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. सलग सुट्या आल्यामुळे तूर खरेदीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, सुटीतही तूर खरेदी होणार आहे.

Apr 29, 2017, 12:02 AM IST

नागपुरात ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना पडून

२२ एप्रिल पासून तूर डाळ खरेदी बंद केल्यापासून अजूनही नागपूर जिल्ह्यात सुमारे ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पडून आहे. 

Apr 28, 2017, 09:27 PM IST

बळीराजापुढे जगण्याचं मोठं आव्हान, लाखांचा पोशिंदा उपाशी

लाखांचा पोशिंदा असलेल्या बळीराजापुढे जगण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शेतक-यांनी खरेदी केंद्रावर आणलेली तूर खरेदी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं खरं. मात्र अजूनपर्यंत तूर खरेदी केंद्रंच सुरु झालेली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

Apr 27, 2017, 07:54 PM IST

शेतकऱ्यांकडून आशेने भाव नसलेल्या तुरीची राखण

विशेष म्हणजे तूर विकण्यासाठी २२ एप्रिल पूर्वीपासूनच अनेक शेतकरी खरेदी केंद्राबाहेर ताटकळत बसून आहेत. 

Apr 27, 2017, 09:16 AM IST

शेतकरी चार दिवसांपासून तूर विक्रीसाठी ताटकळत

 सरकारच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी झालेलीच नाही. सरकारकडून आदेश नसल्याने तूर खरेदी रखडली आहे. खरेदी केंद्रांसमोर शेतकरी अजूनही रांगेतच उभा आहे. तूर उत्पादक शेतक-यांना सरकार दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित करुन ४ दिवसांपासून शेतकरी तूर विक्रीसाठी ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे.

Apr 26, 2017, 05:13 PM IST

शिवसेनेचा भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा

  इतर राज्यात राज्यपाल आणि अनेक पदांवर इतरत्र  rss कार्यकर्त्यांची नेमणूक झालीय. मग देशाचं नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही, असे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. 

Apr 25, 2017, 08:42 PM IST

तूरी खरेदी मुद्द्यावर उद्धव ठाकरे बोललेत...

शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ सोडवला पाहिजे. सध्या तुरीच्या मुद्यावर सरकारने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यासंदर्भात शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Apr 25, 2017, 08:05 PM IST

राणे भाजपमध्ये जाणार या प्रश्नावर उद्धव म्हणाले...

 काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार या शक्यतेची  बातमी अनेक दिवसापासून चर्चिली जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Apr 25, 2017, 06:26 PM IST

शेतकऱ्यांना शिवसेनेने वाऱ्यावर सोडले नाही - उद्धव ठाकरे

 शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे. 

Apr 25, 2017, 04:08 PM IST

तूर खरेदीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीवाला घोर लागलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा केलीय.  

Apr 25, 2017, 12:43 PM IST