आंध्र प्रदेशचे विभाजन, तेलंगणा नवे राज्य
आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासंबंधीच्या वादग्रस्त विधेयकाचा ठराव आज शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला. त्यामुळे नवे तेलंगणा राज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी आणि मूळचे तेलंगणाचे नसलेले इतर काँग्रेस नेते यांचा तेलंगणाच्या निर्मितीला विरोध आहे.
Feb 7, 2014, 11:14 PM ISTउद्या विदर्भ वेगळा करतील, म्हणून विरोध - उद्धव ठाकरे
स्वतंत्र तेलंगणाला शिवसेनेने विरोध केला आहे. तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर भेट घेतली, यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
Feb 5, 2014, 12:26 PM ISTचंद्राबाबू नायडू मातोश्रीवर दाखल
आंध्रप्रदेशात स्वतंत्र तेलंगणावर वातावरण तापलं असतांना, तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
Feb 5, 2014, 11:35 AM ISTजगनमोहन पाठोपाठ आजपासून चंद्राबाबू नायडूंचं उपोषण!
स्वतंत्र तेलंगणा विरोधात तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आजपासून नवी दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडे वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जगनमोहन यांनी शनिवारपासून उपोषणाला सुरुवात केली.
Oct 7, 2013, 10:15 AM ISTस्वतंत्र तेलंगणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलं.
Oct 3, 2013, 08:19 PM ISTशोभा डेंचा मेंदू डोक्याच्या बाहेर- आव्हाड
शोभा डेंचा मेदू डोक्याचा बाहेर असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
Jul 31, 2013, 07:29 PM ISTही पेज थ्री पार्टीतली ओकारी - शिवसेना
महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करण्याची भाषा म्हणजे `ही पेज थ्री पार्ट्यांमधली ओकारी आहे` अशा भाषेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शोभा डे यांना सुनावलंय.
Jul 31, 2013, 03:49 PM ISTशोभा डे, घटस्फोट घेण्याइतकं हे सोपं नाही - राज
मुंबईचं वेगळं राज्य का होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारत लेखिका शोभा डे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घटस्फोट घेण्याइतकं सोप आहे का?, असं राज म्हणालेत.
Jul 31, 2013, 03:24 PM ISTमहाराष्ट्राचा नवा शेजारी... `तेलंगणा`!
स्वतंत्र तेलंगणासाठी सुरू असलेल्या साठ वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. युपीए समन्वय समितीच्या बैठकीत स्वतंत्र तेलंगणाबाबत एकमतानं निर्णय घेण्यात आला.
Jul 30, 2013, 08:36 PM ISTस्वतंत्र तेलंगणाच्या औपचारिक घोषणेची शक्यता
स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय आजच्या यूपीए समन्वय समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
Jul 30, 2013, 10:51 AM IST