नगरसेवक

डोक्यावर फेटे मिरविलेत, चक्क पालिकेला ७७ हजारांचा भुर्दंड

एखाद्याला टोपी घालणे, हा वाकप्रचार आपण नक्कीच ऐकला असेल. पण आता `एखाद्याला फेटा बांधणं` हा वाक्प्रचार देखील त्याच अर्थानं वापरता येईल. त्याचं श्रेय पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना द्यावं लागेल. सभागृहाच्या उद्घाटनासाठी भाड्यानं आणलेले फेटे या मान्यवरांनी गहाळ केलेत. आणि त्याचा भुर्दंड म्हणून ७७ हजार रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिलीय.

Jun 14, 2014, 01:26 PM IST

मनसेचा बालेकिल्ला ढासणार हे समजताच राज नाशिक दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जादू चालणार नाही, हे सर्वच एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे. यावरून राज ठाकरे यांनी नाशिक येथे ज्येष्ठ आमदार उत्तमराव ढिकले यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजतंय.

May 14, 2014, 05:07 PM IST

राज ठाकरे नाशिक दौ-यावर, नगरसेवकांची घेतली परीक्षा

लोकसभा निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौ-यावर आलेत. आज त्यांनी सर्व नगरसेवकाशी वन टू वन चर्चा करून त्यांची तोंडी परीक्षाच घेतली.

May 10, 2014, 08:10 PM IST

काँग्रेस नगरसेवकाने आयुक्तांना धमकावले, सोलापूर बंदची हाक

काँग्रेस नगरसेवकांच्या गुंडगिरीला कंटाळून सोलापूरचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार सोडल्यानं आता तीव्र संताप व्यक्त होतोय. गुडेवारांना पाठिंबा देण्यासाठी बसपा, शिवसेना, भाजप आणि माकपनं बुधवारी `सोलापूर बंद`ची हाक दिलीय.

May 6, 2014, 08:34 PM IST

मनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मान्यता रद्द करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात आज जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनसेला आगामी निवडणुका लढविण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

Feb 10, 2014, 01:19 PM IST

कोल्हापुरात नगरसेवकांच्या अटकेनंतर तणाव

टोलवसुली विरोधात कोल्हापुरात पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कोल्हापुरात शिरोळ नाक्यावर आंदोलन करणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे.

Feb 5, 2014, 02:09 PM IST

शीतल म्हात्रे प्रकरणी पालिकेत हंगामा, पाच नगरसेवक निलंबित

शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई महापालिकेत शिवसेनेची कोंडी विरोधकांनी केली. विरोधकांच्या गोंधळात सभागृह तिसर्‍यांदा गुंडाळले गेले. यावेळी विरोधकांनी गटनेत्यांच्या बैठकीवर बहिष्कार घातला. गोंधळ घातल्याने विरोधी पक्षाच्या पाच सदस्यांवर निलंबनाची कारवाई करीत महापौर सुनील प्रभू यांनी मनमानी कारभार सुरू ठेवला. तसा आरोप विरोधकांनी केलाय.

Jan 22, 2014, 07:38 AM IST

मनसे नगरसेवकाला मारहाण भोवणार

महापालिकेतील दूरसंचार अभियंता राजेश राठोड मारहाणप्रकरणी मनसे नगरसेवक गिरीश धानुरकरांना मारहाण भोवणार अशी चिन्ह आहेत...मारहाण प्रकरणी मनसे नगरसेवक गिरीश धानुरकरांना महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंनी धानुरकरांना नोटीस पाठवलीय.

Dec 30, 2013, 06:02 PM IST

सेनेचे प्रमोदनाना भानगिरे, राष्ट्रवादीचे सुनील टिंगरेही मनसेत!

शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी या दोघांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.

Oct 14, 2013, 07:53 PM IST

बिचाऱ्या नगरसेवकांना ड्रायव्हरचाही खर्च परवडेना!

मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ पालिका अधिकारी दर महिन्याला पेट्रोल-डिझेलवर लाख-सव्वा लाख रूपयांचा खर्च करतात. आता त्यांच्याप्रमाणे आपणालाही ड्रायव्हरसह पेट्रोल-डिझेलचा खर्च मिळावा, यासाठी नगरसेवकही हट्ट धरून बसलेत.

Oct 11, 2013, 05:16 PM IST

'फ्री -स्टाईल' करणाऱ्या ३२ नगरसेवकांवर सेनेची कारवाई

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी झालेल्या हाणामारी प्रकरणाची शिवसेनेनं दखल घेतलीय. याप्रकरणी ३२ शिवसेना नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आलेत. जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी हे राजीनामे घेतलेत

Sep 22, 2013, 03:30 PM IST

नगरसेवकांना वेध मानधनवाढीचे!

पिंपरी-चिंचवडमधल्या नगरसेवकांना आता मानधनवाढीचे वेध लागलेत. प्रति महिना पंचवीस हजार मानधन करावं, अशी त्यांची मागणी आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला.

Sep 17, 2013, 09:45 PM IST

राष्ट्रवादी नगरसेवकाकडून टोल नाक्याची तोडफोड, तलवारीचा वापर

जालना वाटूर रोडवरच्या टोलनाक्यावर जालन्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नूर खान यांनी तोडफोड केल्याचा आरोप कल्याण टोलवेज कंपनीकडून करण्यात आला आहे. यावेळी जमावाच्या हातात तलवारी आणि दंडुके असल्याचे पाहायला मिळत आहेत.

Sep 6, 2013, 02:44 PM IST

ब्लू प्रिंट, नाशिक रस्त्यांबाबत ‘राज’ गप्प!

राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून आज नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर राज ठाकरे आपला दौरा आटोपता घेणार आहे.

Sep 5, 2013, 12:02 PM IST