नोटबंदी

नोटबंदीबाबत 50 दिवस संपेपर्यंत वाट पाहणार, नंतर बोलणार : उद्धव ठाकरे

नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचीच अधिक ओढाताण होत आहे. मात्र 50 दिवसांनी परिस्थिती सुधारेल, असे पंतप्रध नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे पंतप्रधानांवर विश्वास दाखवून 50 दिवस संपेपर्यंत वाट पाहणार आहे. त्यानंतर नोटबंदीवर बोलेन, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

Dec 20, 2016, 02:15 PM IST

देशात रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत राहणार!

देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत अशीच कायम राहील, असे भाकित भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. इको रॅप नावाच्या स्टेट बँकेच्या नियतकालीकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.  

Dec 20, 2016, 11:09 AM IST

पाकिस्तानमध्ये नोटबंदी, 5000च्या चलनी नोटा रद्द

 पाकिस्तानच्या राज्यसभेत देशातल्या 5000च्या चलनी नोटा रद्द टप्प्या टप्प्यानं करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. 

Dec 20, 2016, 07:28 AM IST

नोट बदली करणाऱ्या आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

1.99 कोटी रुपयांच्या नोटा बदली केल्याप्रकरणी सीबीआयनं आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

Dec 17, 2016, 08:43 PM IST

प्रत्येक गोष्ट आपण करत असल्याचा आव आणणं चुकीचं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

Dec 17, 2016, 04:27 PM IST

नोटबंदीचा निर्णय चांगला, पण पर्यायी व्यवस्था करण्यास मोदी अपयशी : पवार

नोटबंदीनंतर देशात सुरु असलेल्या परिस्थितील पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. त्यांनी नोटबंदीचा जो निर्णय घेतला तो चांगला आहे. मात्र, त्यांना पर्यायी व्यवस्था करता आलेली नाही. ते यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

Dec 17, 2016, 04:27 PM IST

नोटबंदीवर रामदास आठवलेंची कविता!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे.

Dec 16, 2016, 08:04 PM IST

'काँग्रेस हितासाठी इंदिरांनी नोटबंदी नाकारली'

1971मध्ये अर्थमंत्री असताना यशवंतराव चव्हाण यांनी नोटबंदीचा प्रस्ताव दिला होता, पण काँग्रेसच्या हितासाठी इंदिरा गांधींनी हा प्रस्ताव धुडकावून लावला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

Dec 16, 2016, 06:11 PM IST