नोटबंदी

नोटबंदीच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नोटबंदीचा खोचक प्रतिक्रिया

Dec 8, 2016, 03:25 PM IST

नोटबंदीच्या विरोधात विरोधी पक्ष पाळतोय काळा दिवस

नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज राज्यसभेत पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला. राज्यसभेत विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांनी सरकारवर टीका करत पंतप्रधानांनी राज्यसभेत उपस्थित राहून चर्चा ऐकावी अशी मागणी करण्यात आली. विरोधकांनी सकाळपासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी पक्षाचे खासदारानीही जोमानं प्रत्युत्तर देत गोंधळात भर घातली. अखेर सभापती हामीद अन्सारी यांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात केलं.

Dec 8, 2016, 12:59 PM IST

नोटबंदीला एक महिना, सूरतमधील हिरे व्यवसायिक अडचणीत

नोटबंदीला आता एक महिना झाला तरी अनेक समस्या कायम आहेत. छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले आहेत. सूरतमधील हिरे व्यावसायिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Dec 7, 2016, 08:33 PM IST

नोटबंदीनंतर ११ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा - RBI

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंदी केल्यानंतर आतापर्यंत साडे अकरा लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा परत आल्या आहे. बाजारात एकूण १५ लाख जुन्या नोटा आहेत. 

Dec 7, 2016, 06:24 PM IST

नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत

नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत करण्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने केली आहे. मात्र, नोटाबंदीवरुन उत्तरप्रदेशमध्ये राजकारण सुरु झाले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

Dec 7, 2016, 06:19 PM IST

नोटबंदीनंतर आता पेट्रोल-डिझेलची धक्कादायक बातमी

नोटबंदीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी एक धक्कादायक बातमी येण्याची शक्यता आहे.

Dec 7, 2016, 05:16 PM IST

नोटबंदीच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही आज नोटाबंदीच्या विषयावर विधानसभेत चर्चेचा फड रंगला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेला सुरूवात करताच मोदी सरकारच्या निर्णयाची जोरदार चिरफाड केली आहे.

Dec 7, 2016, 01:47 PM IST

पाहा काळा पैसा कसा होतो व्हाईट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येईल असा दावा केला जात आहे. मात्र मुंबईतल्या एका व्यक्तीनं बाजारातून ३० ते ५० टक्क्यांनी काळा पैसा पुन्हा कसा पांढरा करुन मिळतोय हे उघडकीस आणले आहे.

Dec 6, 2016, 11:56 PM IST

नोटबंदीनंतर या बातमीने मोदी सरकारची अडचण वाढू शकते

 पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात एक उद्देश हा खोट्या नोटा चलनातून बाद करणे हा होता. पण आता लक्षात येत आहे की जुन्या नोटांसोबत खोट्या नोटाही बँकांमध्ये जमा होत आहे. 

Dec 6, 2016, 06:13 PM IST

हिवाळी अधिवेशनात विधानसभेत नोटबंदीवरुन गदारोळ

हिवाळी अधिवेशनातल्या पहिल्याच दिवशी विधानसभेत नोटबंदीवरुन गदारोळ झाला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात नोटबंदीबाबतचा स्थगन प्रस्ताव फेटाळला गेला. त्यामुळे विरोधक चांगलेच आमक्रमक झाले. सकाळी विधानसभा कामकाजाला सुरुवात होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नोटबंदीविरोधात स्थगन प्रस्ताव आणला. मात्र तो प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला. त्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली. या गोंधळातच सरकारनं सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या.

Dec 5, 2016, 02:12 PM IST

नोटबंदीचा फटका कोकणातल्या पर्यटनाला

प्रत्येक विकेंडला कोकणातल्या पर्यटन ठिकाणी हमखास गर्दी पाहायला मिळतेच मात्र यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. 

Dec 4, 2016, 06:28 PM IST