पोटनिवडणूक

वांद्रे पोटनिवडणूक : शिवसेना - भाजपच्या संयुक्त प्रचारसभा

शिवसेना - भाजपच्या संयुक्त प्रचारसभा

Apr 2, 2015, 11:23 AM IST

पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरेंनी राणेंना पाठिंबा नाकारला

वांद्रे विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी नारायण राणे यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असल्याचं चित्र आहे. कारण नारायण राणे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर, आज नितिश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Mar 23, 2015, 05:42 PM IST

वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना- राणे युद्ध रंगणार?

मेरे अंगनेमं तुम्हारा क्या काम है, असं म्हणण्याची वेळ सध्या शिवसेनेवर आलीय. कारण वांद्रे विधानसभा निवडणुकीचा आखाडा प्रचंड रंगतदार झालाय. शिवसेना आमदार प्रकाश सावंत अर्थात बाळा सावंत यांचं निधन झाल्यानं ही पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं नारायण राणेंना उमेदवार म्हणून विचारणा केली आणि मोठ्ठा ट्विस्ट आला. एकेकाळी सिंधुदुर्गाचा राजा असलेल्या राणेंना विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या लोकांनी असं काही अस्मान दाखवलं की राणेंवर मुंबईमार्गे विधिमंडळात शिरण्याची वेळ आलीय. मुळातच विधानसभेच्या बाहेर असलेले राणे प्रचंड अस्वस्थ आहेत. प्रदेशाध्यक्षपदीही त्यांची डाळ शिजली नाही. सेना-भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा आणि कमकुवत विरोधक अशा परिस्थितीत राणेंना आखाड्यात उतरायला योग्य बॅटल स्पिच तयार झालंय. 

Mar 12, 2015, 07:56 PM IST

आबांचा वारसदार कोण? तासगावची पोटनिवडणूक जाहीर

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. 

Mar 11, 2015, 08:40 AM IST

पंकजा मुंडे विधानसभेच्या तर प्रीतम लोकसभेच्या रणांगणात

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर त्यांच्या कुटुंबाचाच हक्क आहे, असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी अखेर विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय.

Sep 24, 2014, 08:08 PM IST