बंडखोर

कोल्हापुरातून सतेज पाटील विजयी; बंडखोर महाडिकांना धोबीपछाड

संपुर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी बाजी मारलीय. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार महादेवराव महाडिक यांचा ६३ मतांनी धोबीपछाड केलाय. तब्बल तीन वेळा विधान परिषदेची निवडणूक जिंकणाऱ्या महादेवराव महाडिक यांना चमत्कार होईल असं वाटत होतं, पण तसं काही घडलंच नाही.

Dec 30, 2015, 12:46 PM IST

औरंगाबादेत सेना-भाजपला बंडखोरीचा फटका

औरंगाबादेत शिवसेना भाजप यांची युती झाली असली तरी अनेक वार्डात दोन्ही पक्षांचे बंडखोर आमनेसामने उभे ठाकले आहे. तर काही ठिकाणी त्या त्या पक्षातील नाराजांनीच त्यांच्याच पक्षासमोर आव्हान उभं केलं आहे, यामुळं युतीलाच फटका बसण्याची शक्यता आहे. 

Apr 13, 2015, 06:59 PM IST

UPDATE: या 'बंडोबां'चे आज झाले 'थंडोबा'!

इच्छुक पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागलाय. अनेक उमेदवारांनी बंडाचं शस्त्र उपसलंय. मात्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं बंडखोरांना शांत करण्याचा नेतेमंडळी चांगलाच प्रयत्न करतांना दिसतायेत. अनेक बंडोबांचा आता त्यामुळं थंडोबा झालाय. 

Oct 1, 2014, 04:22 PM IST

शिवसेनेते पहिल्या बंडखोरीची शक्यता

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेत पहिली बंडखोरी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 

Sep 26, 2014, 01:42 PM IST

इराकमध्ये बंडखोर आक्रमण, अमेरिकेची हल्ल्याची तयारी

इराकच्या उत्तरेकडील एका शहरावर कब्जा केल्यानंतर बंडखोरांनी गुरुवारी बगदादच्या दिशेने आगेकूच केली आहे. दरम्यान, अमेरिकेची सुरक्षा इराकमध्ये कमजोर झाली आहे. त्यामुळे हवाई हल्ला करण्याचा विचार अमेरिका करत आहे.

Jun 13, 2014, 11:11 AM IST

जाणून घ्या... शिवसेनेतल्या ‘बंडखोरां’चा इतिहास!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अपमानित होऊन व्यासपीठावरून घरी जावं लागलं.

Oct 15, 2013, 06:13 PM IST

उमेदवारांबरोबर फिरतात, प्रचार करतात विरोधकांचा - अजितदादा

बंडखोरी मागे घेतलेले कार्यकर्ते फिरतात पक्षाच्या उमेदवाराबरोबर आणि प्रचार करतात विरोधकांचा असा अनुभव असल्याचं अजित पवारांनीच सांगितलं आहे. खडकवासल्याच्या पराभवातून हा धडा शिकल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

Feb 9, 2012, 11:34 PM IST

भाजपला बंडोबांचा झटका

‘पार्टी विथ डिफरन्स’ हे ब्रीद मिरविणाऱ्या भाजपलाही महापालिकेच्या निवडणुकीत बंडोबांनी झटका दिला आहे. मुंबईतील पक्षाच्या कार्यालयासमोर नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.

Feb 1, 2012, 10:46 PM IST

काँग्रेस- राष्ट्रवादीत बंडाळी

सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षालाही बंडाचा फटका बसला आहे. तिकीट न मिळालेल्या एका इच्छुक महिला कार्यकर्तीने थेट प्रदेशाध्यक्षांना जाब विचरण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी काम करणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Feb 1, 2012, 10:33 PM IST

शिवसेनेतील बंडखोर

एकेकाळी शिवसेनेत बंडाला स्थान नव्हतं. पण आता शिवसेनेलाही आता बंडखोरीची लागण झाली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेनं उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचं वाटप करण्याची रणनीती आवलंबली होती. पण काही ठिकाणी बंडखोरी झालीच.

Feb 1, 2012, 10:26 PM IST

राज यांचे 'ना-राज' बंडखोर

राज ठाकरेंच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही उमेदवारी न मिळाल्यामुळे काही मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज'वर धाव घेतली होती. खरं तर जेव्हा जेव्हा मनसैनिक कृष्णकुंजवर येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. मात्र य़ावेळी चित्र काही वेगळं होतं.

Feb 1, 2012, 10:17 PM IST

काँग्रेसविरोधात मुंबईत उघड बंड

मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी कॉंग्रेसविरोधात उघड बंड केलं आहे. तिकीट वाटपाच्यावेळी पैसे घेतल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी केला आहे. सामन्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. सावंत हे गुरूदास कामत गटाचे कट्टर समर्थक मानले जात आहेत. त्यामुळे कामत गटातील कार्यकर्त्यांनी डावल्याची चर्च आहे. अन्याय झाल्याचे सांगत मीना देसाई, कमलेश यादव यांनी बंडखोरीचा पर्याय स्वाकारला आहे.

Jan 31, 2012, 04:14 PM IST