www.24taas.com, वृत्तसंस्था, किरकूक, इराक
इराकच्या उत्तरेकडील एका शहरावर कब्जा केल्यानंतर बंडखोरांनी गुरुवारी बगदादच्या दिशेने आगेकूच केली आहे. दरम्यान, अमेरिकेची सुरक्षा इराकमध्ये कमजोर झाली आहे. त्यामुळे हवाई हल्ला करण्याचा विचार अमेरिका करत आहे.
सुन्नी मुस्लिम इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड लेवॅट (आयएसआयएल)च्या क्षेत्रात सोमवारी हल्ले करण्यात आले. याचे नेतृत्व बंडोखोरांनी केले आहे. प्रत्यक्षदर्शी आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की, धुलुईयाह शहरावर बंडोखोरांनी कब्जा केला आहे. त्यानंतर हे बंडोखोर बगदादच्या दिशेने कूच करीत आहेत. यावेळी त्यांनी मुआतस्साम या भागावर नियंत्रण मिळविले आहे. जेहादी बेबसाईटच्या वृत्तानुसार आयएसआयएलचा प्रवक्ता अबु मोहम्मद अल अदनानी तसा दावा केला आहे. या संघटनेचे आणखी काही सदस्यांनी बगदाद आणि शिया मुस्लिम यांच्या प्रसिद्ध शरहारांपैकी करबाला या शहरावर हल्ला करण्याची तयारी केली आहे.
दरम्यान, इराकच्या संसदेत पंतप्रधान नुरी अल मलिकी आणि राष्ट्रपती कार्यालयाने यापार्श्वभूमीवर आपात्कालीन परिस्थिती घोषित करायची की नाही, यावर चर्चा केली. मात्र, आपात्कालीन परिस्थिती करण्यास विरोध केलाय. त्याचवेळी आपात्कालीन अधिवेशन बोलविले आहे. जर आपात्कालीन परिस्थिती जाहीर करण्यासाठी दोन तृतियांश बहुमताची गरज आहे. मात्र, संसदेत हा प्रस्तावर मंजूर होण्याची शक्यता कमी आहे.
इराकी सरकारचा अमेरिकेकडून मदत घेण्याचा विचार सुरु आहे. बगदादमध्ये ड्रोन हल्ले करण्यासाठी आणि अमेरिकी सैन्याची मदत घेण्याचा विचार पंतप्रधान करीत आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेन पसाकी यांनी स्पष्ट केलेय. बंडखोरांचे आक्रमण रोखण्यासाठी अमेरिका मदत करण्यासाठी तयार आहे. मात्र, अमेरिकेची सैन्य पाठविण्याची कोणतीही योजना नाही, असे ते म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.