नरेंद्र मोदी निघाले लंडनला!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये म्हणून काही भारतीय खासदारांनी फिल्डींग लावली. यावरून बराच वाद झाला. तर कट्टर हिंदूत्ववादी मोदी आहेत, असा ठपका ठेवत काही देशांनी मोदींना परदेश बंदी केली. मात्र, आता ब्रिटनने मोदींना व्हीसा देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे मोदींचा लंडन प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Aug 14, 2013, 11:37 AM ISTजाणून घ्या... कधीपर्यंत जगणार तुम्ही?
ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी पहिल्यांदा ‘डेथ टेस्ट’ नावाचं एक तंत्रज्ञान विकसीत केलंय. या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं एखादी व्यक्ती किती दिवस जगणार हे समजू शकणार आहे.
Aug 14, 2013, 08:01 AM ISTब्रिटनला मिळाला नवा राजपुत्र!
इंग्लंडमध्ये राजघराण्याला नवा वारस मिळालाय. नव्या राजपुत्राचा जन्म झालाय. केट मिडलटनने गोंडस बाळाला जन्म दिलाय. प्रिन्स विलियम्स पिता बनल्यानं इंग्लंडमध्ये आनंदोत्सव साजरी होतोय.
Jul 23, 2013, 08:05 AM ISTमलाला संयुक्त राष्ट्रात बोलली, अन् सर्व अचंबित झालेत!
प्रिय बंधु आणि भगिनींनो, जगात कोट्यवधी लोक गरीबी आणि उपेक्षेचं जिणं जगतायेत. हे आपण विसरता कामा नये. जगभरातल्या लहान मुलांचं अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी, मुलींना शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी विकसित देशांनी पुढे यावे. जगभरातल्या सगळ्यांनाच सहनशीलतेचं मी आवाहन करते, असे उद्गार मलाला यूसुफजई हिने काढले.
Jul 13, 2013, 08:55 AM ISTखरेदी करा, वापरा आणि परत करा...
ब्रिटनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार एक धम्माल गोष्ट पुढे आलीय. या सर्वेक्षणानुसार, अनेक स्त्रिया महागडी वस्त्र खरेदी करतात, तेही फक्त एका दिवसापुरतं वापरण्यासाठी... आत्ता तुम्ही म्हणाल या महागाईच्या दिवसांत हे कसं शक्य आहे? तर या प्रश्नावरही काही स्त्रियांनी उपाय शोधून काढलाय.
Jun 12, 2012, 09:21 AM ISTअनुजला न्याय मिळणार का?
ब्रिटनमध्ये हत्या झालेल्या पुण्याच्या अनुजचा मृतदेह मिळायला आणखी दोन आठवडे लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्याचे मित्र सोशल साईटसवरुन सक्रीय झाले आहेत. दुसरं म्हणजे अनुजच्या हत्येमुळे परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
Dec 29, 2011, 07:20 PM ISTब्रिटनमध्ये वर्णद्वेषातून भारतीय तरूणाची हत्या
ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या पुणेकर विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुज बिडवे असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे अनुजची हत्या वर्णद्वेषातून झाल्याचा संशय आहे.
Dec 28, 2011, 05:41 PM IST