मध्य प्रदेश

पन्ना इथं बस पूलावरून पडली, 35 जणांचा जळून मृत्यू

एका खाजगी कंपनीची बस नाल्यात पडल्यानं आग लागून त्यातील 35 प्रवाशांचा जळून मृत्यू झालाय. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पांडव झऱ्याजवळ घडली.

May 4, 2015, 10:03 PM IST

जर नवरा ११ वर्षाचा आणि नवरी २५ वर्षाची तर हे होणारच...

लग्नाची सगळी तयारी झाली होती.. नवरीच्या घरची मंडळी नवऱ्याच्या घरी पोहचणार.. त्याआधीच पोलिसांनी तेथे येऊन लग्न थांबवलं. लग्न थांबवण्याचं कारण होतं मुलाचे आणि मुलीचे वय.

Apr 24, 2015, 11:08 AM IST

एमपीच्या अर्थमंत्र्यांना रेल्वे प्रवासादरम्यान लुटलं

रेल्वे प्रवासादरम्यान मध्यप्रदेशच्या अर्थमंत्र्यांसह त्यांच्या पत्नीला लुटलंय. ही धक्कादायक घटना मथुरेमधील कोसीकलनजवळ रेल्वेप्रवासादरम्यान घडली. मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया हे कुटुंबासह जबलपूरपासून दिल्लीला जाणाऱ्या निझामुद्दीन एक्‍सप्रेसमधून प्रवास करत होते. 

Mar 19, 2015, 09:28 PM IST

'शेर का बच्चा एकही अच्छा, हे चूक आहे'

भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पाठिंबा दर्शविला आहे. हिंदूंना चार अपत्य असावीत असं साध्वी प्राची यांनी राजस्थानातील भिलवाडा येथे बोलतांना म्हटलंय.

Jan 13, 2015, 12:17 PM IST

मध्यप्रदेश जेलमधून फरार झालेले अतिरेकी जळगावात वास्तव्यास?

 मध्यप्रदेशातल्या जेलमधून फरार झालेले सिमी या प्रतिबंधित अतिरेकी संघटनेचे ५ अतिरेकी जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यासाठी दहशतवाद विरोधी पथकानं नुकतीच जळगावात येऊन चौकशी केल्याचं समजतंय.

Dec 12, 2014, 03:33 PM IST

जेलमधून पाच दहशतवादी पसार, देशभरात हायअलर्ट

मध्य प्रदेशतल्या जेलमधून पाच दहशतवादी पसार झाले आहेत. आयएसआयच्या सांगण्यावरून हे दहशतवादी देशात कुठंही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुप्तचर संस्थेनं देशभरात हाय अलर्ट जारी केलाय.

Dec 8, 2014, 07:59 PM IST

व्हिडिओ: पुराच्या पाण्यासोबत खेळ पडला महागात!

पुराच्या पाण्यासोबत स्टंट करणं कसं महागात पडू शकतं, याचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय.

Jul 22, 2014, 09:11 PM IST

<B> <font color=#3333cc>चला इन्कम टॅक्स ऑफिसर होण्याची संधी!</font></b>

मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशननं योग्य उमेदवारांकडून इन्कम टॅक्स ऑफिसरच्या पोस्टसाठी अर्ज मागवले आहेत. २६३ जागांसाठी ही भरती होणार असून मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी ४ फेब्रुवारी २०१४ पूर्वी हे अर्ज पाठवायचे आहेत. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे.

Jan 23, 2014, 12:56 PM IST

पराभवानंतर काँग्रेसला राष्ट्रवादीने काढला चिमटा

मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगढ या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्र पक्ष काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी दिला आहे.

Dec 8, 2013, 07:09 PM IST

मध्य प्रदेशात पुन्हा भाजपला कौल, विजयाची हॅटट्रिक!

मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने आपला करीष्मा दिसून आलाय. मतदारांनी भाजपलाच कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजयाची हॅटट्रिक भाजप साधणार असेच दिसतेय. १३४ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची बहुमताकडे सध्यातरी वाटचाल दिसून येत आहे.

Dec 8, 2013, 10:52 AM IST

मध्य प्रदेश: शिवराजसिंह चौहान की ज्योतिरादित्य शिंदे?

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान गाजलेले प्रचाराचे मुद्दे आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपनं जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा केल्या आहेत ते. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी निवडणूक होत आहे. २००८ मध्ये १४३ जागांसह भाजपनं पुन्हा सत्ता काबिज केली होती. काँग्रेसला ७१ जागा मिळाल्या होत्या. बसपानंही आपली सात जागांवर ताकद दाखवली होती. तर इतरांना नऊ जागा मिळाल्या होत्या.

Dec 8, 2013, 09:13 AM IST

बाबांनी सांगितलंय, राजकारणात जाऊ नकोस! मग कसा जाणार? - सचिन

मध्य प्रदेश काँग्रेसने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवस काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, या वृत्ताबाबत तथ्य नसल्याचे सचिनच्या सूत्रांकडून स्पष्ट झाले होते. त्यानंतर सचिनने तसे स्पष्ट केल्याने मध्य प्रदेश काँग्रेसचा हा स्टंट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. याबाबत सचिने म्हटलं आहे की, मी राजकारणापासून दूर रहावे, अशी माझ्या बाबांची इच्छा होती.

Oct 29, 2013, 02:54 PM IST