<B> <font color=red>नरेंद्र मोदी:</font></b> जनतेचे आभार, त्यांनी एका चहावाल्याला मुख्यमंत्री केलं
नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर आज भारत स्वाभिमान ट्रस्टच्या स्थापना दिवसाच्या कार्य़क्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात योगगुरु रामदेवबाबांसोबत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका करत जनतेचे आभारही मानले आहेत.
Jan 5, 2014, 07:16 PM ISTमला तिसऱ्यांदा पंतप्रधान पद नको - मनमोहन सिंग
आम्ही अनेक देश हिताचे निर्णय घेतले आहेत. मला कधीही राजीनामा द्यावासा वाटला नाही. मात्र, चार राज्यांतील निवडणुकीतील पराभवाला महागाई कारणीभूत ठरू शकते. मी नवीन व्यक्तीला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. यावरून त्यांनी पंतप्रधान पद सोडण्याची तयारी दाखवून दिली आहे.
Jan 3, 2014, 11:50 AM ISTपंतप्रधानांनी फेटाळून लावलं राजीनाम्याचं वृत्त...
पंतप्रधान मनमोहन सिंग नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलं होतं. यावर पंतप्रधान कार्यालयानं तातडीनं स्पष्टीकरण देत या वृत्ताला उडवून लावलंय.
Dec 31, 2013, 12:20 PM ISTजातीय हिंसाचार विधेयक विरोधात मोदींचं पंतप्रधानांना पत्र
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणारेय. मात्र भाजपनं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच जातीय हिंसाचार विधेयकावर प्रश्न उपस्थित केलेत... नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांना पत्र पाठवून काही प्रश्न उपस्थित केलेत...
Dec 5, 2013, 12:21 PM IST... आणि क्रिकेटच्या देवासाठी पंतप्रधानही थांबले!
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही सचिन तेंडुलकरला त्याला जाहीर झालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराबाबत फोनवरून शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी थोडा वेगळा प्रकार घडला.
Nov 16, 2013, 10:08 PM IST‘सिंग इज किंग’, पंतप्रधान ठरले अव्वल ‘सिंग’!
जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग अव्वल नंबरवर आहेत. ‘शीख १००’ या मासिकानं जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख असल्याचं म्हटलंय.
Nov 10, 2013, 08:30 PM ISTपंतप्रधानांची मोदींना गुगली, बाता मारून सत्ता मिळत नाही!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना टार्गेट केलं. मोदी केवळ विकासाच्या बाता मारत आहेत. अशा बाता मारून सत्ता मिळवता येत नाही, असा टोला पंतप्रधान यांनी मोदींना लगावला.
Nov 9, 2013, 09:18 PM ISTजर देशाचे पहिले पंतप्रधान सरदार पटेल असते, तर...- मोदी
“सरदार पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, तर आज देशाचं चित्र वेगळं असतं”, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या समक्ष म्हटले. देशाचे पहिले गृहमंत्री तसंच स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित वस्तु संग्रहालयाच्या उद्घाटन सोहळ्यात नरेंद्र मोदी असं म्हणाले.
Oct 29, 2013, 08:45 PM ISTकांद्यानं केला दिल्लीकरांचा वांदा, 'नाशिक'ला हाक?
कांद्यानं दिल्लीत सेंच्युरी गाठल्यानं सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या पायाखालची जमीन सरकलीय. कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट नाशिकमधून दिल्लीला कांदा पुरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
Oct 24, 2013, 07:31 PM IST`मला पंतप्रधानपदाचा अपमान करायचा नव्हता`
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषी खासदार तसंच आमदारांच्या बचावासाठी मांडण्यात आलेल्या वटहुकूमावर चर्चा करण्यासाठी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
Oct 2, 2013, 11:48 AM ISTराहुल गांधींनी घेतली पंतप्रधानांची भेट
दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू आहे. दोषी गुन्हेगार आमदार-खासदारांना अभय देणारा सरकारचा वटहुकूम आणि त्यावर राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य या संदर्भात थोड्याच वेळात राहुल गांधी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.
Oct 2, 2013, 10:32 AM ISTपंतप्रधान राहुल गांधींच्या वक्तव्यावर नाराज!
अमेरिकेच्या दौ-यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राजीनामा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मी राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत त्यामुळे मी विचलित होत नाही, असं पंतप्रधान म्हणाले.
Oct 1, 2013, 11:11 PM IST`पंतप्रधानांच्या पाठिशी पक्ष`... सोनियांचं मोदींना सडेतोड उत्तर
दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर तीसऱ्या दिवशी क्राँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संपूर्ण काँग्रेस पक्ष पंतप्रधानांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचं स्पष्ट केलंय.
Oct 1, 2013, 09:18 AM ISTमुंबई हल्ल्याच्या दोषींवर कारवाई करू- शरीफ
संयुक्त राष्ट्र समितीच्या परिषदेत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानातून होण्या-या वाढत्या अतिरेकी कारवायांप्रकरणी भारताने चिंता व्यक्त केली.
Sep 29, 2013, 11:58 PM ISTमनमोहन-शरीफ भेटणार, पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर!
पंतप्रधान मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी अमेरिका दौऱ्यावर रवाना झालेत. आज ते वॉशिंग्टनमध्ये पोहोचतील. त्यानंतर शुक्रवारी ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्य़क्ष ओबामा यांच्या भेटीत अनेक प्रादेशिक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Sep 26, 2013, 09:13 AM IST