म्हाडा

म्हाडाचं घरं... अन् हेलपाटे घालून मर!

म्हाडानं घरांसाठी नवीन जाहिरात दिलीय. पण, म्हाडाचं घर घेणं म्हणजे काय दिव्य असतं, ते अनुभवायचं असेल तर मालाड मालवणी भागातील म्हाडा कॉलनीला भेट द्यायलाच हवी.

Mar 2, 2014, 11:36 AM IST

म्हाडाची २०१४ घरे, जाहिरात प्रसिद्ध

म्हाडानं २०१४ साठी घरांची जाहिरात प्रसिद्ध झालीय. २६४१ घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालीय. मुंबई आणि कोकण मंडळाच्या विविध घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालीय.. यंदा म्हाडाच्या घरांच्या किंमती १२ लाखांपासून ८१ लाखांपर्यंत असणार आहेत.

Feb 28, 2014, 02:51 PM IST

पाहा, म्हाडाची ही घरं तुमच्यासाठी आहेत?

म्हाडानं यंदा आपल्या घरांच्या किंमतीत रेकॉर्ड करण्याचं ठरवलेलं दिसतंय. येत्या दोन दिवसांत म्हडाच्या तब्बल ८७८ घरांसाठी लॉटरी जाहीर होणार आहे.

Feb 21, 2014, 09:47 AM IST

`महायुती`च्या पाच पांडवांत शकुनीमामा?

पाच पांडव म्हणून एकत्र आलेल्या महायुतीमध्ये सध्या फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय... याला कारण आहे ते माढा लोकसभा मतदारसंघाचं.

Feb 15, 2014, 06:09 PM IST

एक्सक्लुझिव्ह : म्हाडाच्या तयार इमारती गर्दुल्यांसाठी?

म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये वर्षानुवर्षे नरकयातना भोगणाऱ्या रहिवाशांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम म्हाडा करतंय. गेल्या आठ वर्षांपासून सायनच्या प्रतिक्षानगरात ट्रान्झिट कॅम्पची बिल्डिंग बांधून तयार आहे. परंतु करोडो रूपये खर्च करून बांधलेली ही इमारत ओस पडून आहे.

Oct 28, 2013, 08:01 PM IST

...असे आहेत म्हाडाचे नवे ‘उत्पन्न गट’

म्हाडाने लॉटरीसाठीच्या उत्पन गटाच्या निकषांमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहे. या नवीन बदलांमुळे लॉटरी विजेत्यांना कर्ज मिळणे सहज शक्य होणार असल्याचा दावा म्हाडाने केलाय.

Oct 24, 2013, 10:49 PM IST

`झी मीडिया`चा दणका : `ट्रान्झिट कॅम्प`च्या छळछावण्यांमधून सुटका

मुंबईतील म्हाडाच्या ट्रान्झिट कँपमध्ये गेल्या २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून राहणाऱ्या रहिवाशांना कायमस्वरुपी घर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी ही माहिती दिलीय.

Oct 2, 2013, 01:16 PM IST

झी मीडियाचा दणका: ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना मिळाला न्याय

म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमधले रहिवासी अक्षरशः नरकयातना भोगत होते. जिथं दहा मिनिटं उभं राहिलं तरी जीव गुदमरतो तिथं गेली अनेक वर्षं दोनशे कुटुंब कसेबसे दिवस काढत आहेत. झी मीडियानं हाच मुद्दा लावून धरला आणि अखेर इथल्या रहिवाशांना न्याय मिळाला.

Oct 1, 2013, 05:44 PM IST

म्हाडा आता `सर्वसामान्यांसाठी` उरलं नाही!

म्हाडाच्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहचल्या आहेत. त्यातच घरांच्या किंमती कमी करण्याचं सोडून आता म्हाडानं उत्पन्न गटाच्या मर्यादेत बदल करून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय.

Sep 24, 2013, 08:34 AM IST

म्हाडाची खुशखबर; आता मिळणार ३५६ फुटांचं घर!

सध्या म्हाडाच्या १६० फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना म्हाडानं खुशखबर दिलीय. वसाहतींच्या पुनर्विकासात सध्या १६० फुटांच्या घराच्या ऐवजी ३५६ फुटांचं घर मिळणार आहे.

Sep 3, 2013, 09:18 AM IST

`हाय क्लास` सोसायट्यांतही दाखल होणार मध्यमवर्गीय!

बिल्डरांचा हा ‘हम करे सो...’ रोखण्यासाठी यापुढे २० टक्के फ्लॅट मध्यमवर्गासाठी बांधणं बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.

Aug 28, 2013, 10:45 AM IST

आता म्हाडाची घरंही द्या अधिकृतरित्या भाड्यानं!

म्हाडाच्या नव्या निर्णयानं म्हाडाच्या घरात राहणाऱ्या भाडेकरुंना दिलासा मिळालाय. म्हाडाची घरं आता भाड्यानं देता येणार आहेत. मात्र, त्यासाठी म्हाडाची पूर्वपरवानगी असणं आवश्यक असणार आहे.

Aug 7, 2013, 09:40 AM IST

म्हाडाच्या घरांची लॉटरी झाली सुरू...

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १२४४ घरांच्या लॉटरीचा निकाल आज लागला आहे. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात येतो आहे

May 31, 2013, 01:23 PM IST

म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसामान्यांची पाठ

सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे अशी जाहिरात करणा-या म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसमान्य पाठ फिरवत आहेत. गेल्या पाच लॉटरीतील अर्ज करणा-यांची संख्या बघितली तर दरवर्षी ती कमी होत असल्याचं स्पष्ट होत आहे.

May 8, 2013, 08:39 PM IST

म्हाडा ऑनलाईन अर्जासाठी इथं क्लिक करा

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर म्हाडाची १२५९ घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. १ मे पासून म्हाडांच्या घरासाठीचे अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

Apr 28, 2013, 08:02 AM IST