अनंत गितेंबाबत अजून कोणताही विचार नाही – राजनाथ सिंह
भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा प्रश्न अद्याप अधांतरी आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही यावर स्पष्ट उत्तर देणं टाळलंय. गिते यांच्या मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही विचार झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
Sep 28, 2014, 04:16 PM ISTपाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरूच, भारताकडून चोख प्रत्युत्तर
सीमाक्षेत्रात पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. शनिवारी रात्री जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याकडून BSFच्या चौक्यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला.
Aug 24, 2014, 12:05 PM ISTबेळगाव मारहाणप्रकरणी सेनेचे खासदार राजनाथसिंहांना भेटले
सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलीसांनी केलेल्या अन्यायाविरोधात आज शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी भेट घेतली. या भेटीत कर्नाटक पोलिसांवर कारवाई करावी. तसंच हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा अशी मागणी या शिष्टमंडळानं गृहमंत्र्यांकडे केली.
Jul 30, 2014, 09:41 PM ISTअमित शहा होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष?
भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असलेले अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हे जवळपास ठरलेलं आहे.
Jun 26, 2014, 09:04 AM ISTमुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा- देवेंद्र फडणवीस
गोपीनाथ मुंडे अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी राजनाथ सिंहांची भेट घेतली. राजनाथ सिंहांसह सकारात्मक चर्चा झाली असून अधिकृत घोषणा गृहमंत्री करतील असं फडणवीसांनी सांगितलंय.
Jun 10, 2014, 11:25 AM ISTअडवाणी लोकसभा अध्यक्ष तर राजनाथ मोदींच्या कॅबिनेटमध्ये?
नव्या सरकार स्थापनेसाठी दिल्लीत घडामोडींना सुरुवात झालीय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. या दोघांमध्ये कॅबिनेट संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.
May 18, 2014, 02:47 PM ISTहा विजय शानदार आणि ऐतिहासिक - राजनाथ
प्रचंड मोठ्या विजयानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी हा विजय ऐतिहासिक आणि शानदार असल्याचं म्हटलं आहे, तसेच आम्हाला मिळालेला जनादेश हा परिवर्तनासाठी आहे.
May 16, 2014, 03:48 PM ISTराजनाथ सिंहांना हवीय नंबर दोनची जागा!
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचं करायचं काय, असं मोठं प्रश्नचिन्ह सध्या भाजपला आणि संघाला पडलंय. तर सरकारमध्ये नंबर दोनची पोझिशन राजनाथ सिंहांना हवीय, असं बोललं जातंय.
May 15, 2014, 05:10 PM ISTमनसेला महायुतीत आणा, भाजप अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
मनसेला सोबत घेऊन निवडणुकीत उतरा असा सल्ला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. जर मनसे सोबत येत नसेल, तर किमान मैत्रिपूर्ण वातावरणात निवडणूक लढवा, म्हणजेच मनसे विरोधात महायुतीच्या विरोधात जाणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Jan 15, 2014, 05:24 PM ISTराजनाथ सिंह उद्धव ठाकरेंच्या भेटीला
राजनाथ सिंहांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची रात्री उशिरा भेट घेतली. दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली.
Jun 18, 2013, 11:56 PM ISTरविवारचा दिवस मोदींसाठी `लकी` ठरणार?
भाजपच्या गोव्यात सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत पहिल्या दिवशी चर्चा होती ती नरेंद्र मोदींच्या नावाचीच...
Jun 8, 2013, 10:26 PM ISTभाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर
भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा करण्याती आली आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या घरी बैठक झाली. यावेळी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. उपाध्यक्षपदी उमा भारती यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या नवी कार्यकारीणीची नावे.
Mar 31, 2013, 12:45 PM ISTभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची मोदींची छाप
भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा करण्याती आली आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या घरी बैठक झाली. यावेळी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. उपाध्यक्षपदी उमा भारती यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारीणीत गुरजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची छाप दिसून येत आहे.
Mar 31, 2013, 10:48 AM ISTभाजप बैठकीत नरेंद्र मोदींचा बोलबाला
भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत नरेंद्र मोदींचाचं बोलबाला होता. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी नरेद्र मोंदीचं भरभरून कौतुक केलंय.
Mar 3, 2013, 08:32 AM ISTआज भाजप कार्यकारिणीची बैठक... बंद दाराआड!
दिल्लीत आज भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होतेय. या बैठकीत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Mar 1, 2013, 11:20 AM IST