भाजप बैठकीत नरेंद्र मोदींचा बोलबाला

भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत नरेंद्र मोदींचाचं बोलबाला होता. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी नरेद्र मोंदीचं भरभरून कौतुक केलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 3, 2013, 08:32 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत नरेंद्र मोदींचाचं बोलबाला होता. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी नरेद्र मोंदीचं भरभरून कौतुक केलंय. राजनाथ सिंह यांनी गुजरातमध्ये मोदींनी विजय हॅट्ट्रीक साजरी केल्याचं म्हटलंय. यावेळी हार घालून मोंदीचं विशेष स्वागत करण्यात आलंय.
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात दुसऱ्या दिवशीही गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची हवा होती. सर्वच नेत्यांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केले. कुणी त्यांच्या विकास मॉडेलचा तर कुणी प्रशासकीय कार्यशैलीचा दाखला दिला. सलग दुसऱ्या दिवशी व्यासपीठावर मोदींचे अभिनंदन करून भाजपने एक प्रकारे त्यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब केले.
शनिवारी मोदींचा हा सन्मान केला जात असताना उपस्थित सुमारे चार हजार प्रतिनिधींनी उभे राहून त्यांच्या कार्याला पावती दिली. मोदींचा असा उभा राहून सन्मान पाहून उपस्थितांमध्ये चर्चा होती. मोदीच होणार पंतप्रधान.

राष्ट्रीय राजकारणात आता मोदींवर मोठी जबाबदारी दिली जाण्याचेच हे संकेत मानले जात आहेत. तालकटोरा स्टेडियममध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी सत्कार करण्यासाठी मोदींचे नाव घेताच उपस्थित प्रतिनिधी उभे राहिले. मोदींनी व्यासपीठावर राजनाथसिंह यांची गळाभेट घेतली.